
आयुष्यात चांगला गुरू हा नेहेमी यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो पण नेहेमी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की त्यातून स्वतःला मात्र संघर्ष करावाच लागतो.खरंतर नारळ सर्वांना माहीत आहे, नारळाचे वरचे मजबूत आवरण कवच फोडल्या शिवाय त्या आतील अमृताचा आस्वाद घेता येत नाही,
अगदी तसेच प्रगतीच्या चांगल्या मार्गावर येणाऱ्या संकटावर मात केल्याशिवाय यशाच महत्व आणि यशाला गवसणी सुद्धा घालता येत नाही ही वस्तुस्थिती आहे.संघर्ष करणे हा यशाचा एकमेव मार्ग आहे. मग तो स्वतःशी असो किंवा समाजाशी. जर तुम्ही स्वतःशी किंवा आयुष्याशी खूप संघर्ष करत असाल तर स्वतःला खूप भाग्यवान समजा कारण नियती ही संघर्ष करण्याची संधी त्यांनाच देते ज्यांच्यात संघर्ष करायची क्षमता असते.
परिवर्तन किंवा बदल हा संसाराचा नियम आहे, तो आपण न घाबरता मान्य केला पाहिजे.माणसांच्या जीवनात सर्वात मोठा गुरू हा येणारा काळ असतो. बदलता काळ माणसाला जगण्याची शिकवण देत राहतो.प्रत्येक वेळी वाटत असते स्वतःला की आज तरी माझ्या आयुष्यात सगळं चांगलं होईल.
खरंतर प्रत्येक माणसाची अपेक्षा असते की त्याचं आयुष्य सार्थक झालं पाहिजे त्याला सुद्धा परमेश्वराची कृपादृष्टी लाभली पाहिजे पण सर्वांत आधीसद्गुरूंची मनोभावे भेट होई पर्यंत तरी आपण आपल्याकडून स्वामींचे नामस्मरण करीत राहिने आवश्यक आहे. कारण त्याच नामस्मरनातुन आपल्याला सदगुरूची भेट होईल.
एक काळ असा होता जेंव्हा आपली संताची भेट होणे कठीण असायचे आणि समजा भेट झाली तरी त्याच्यावर विश्वास बसणे त्याहून कठीण जायचे. म्हणून विश्वास असो किंवा नसो आपण देवावर विश्वास ठेवावं लागतो म्हणून नामाचे साधन म्हणून देवाचे नामस्मरण चालू ठेवले पाहिजे.
जसे की, साखर ठेवली म्हणजे मुंग्याना आमंत्रण द्यावे लागत नाही ते आपोआप तिचा शोध घेत साखरे पर्यंत येतात. तसेच तुम्ही साखर व्हा जेणेकरून संत तुमच्यावर प्रसन्न होतील.आपण आयुष्यात साखर बना म्हणजे तुम्ही असे वर्तन करा जे संतांना आवडेल.
कारण सद्गुरू ना भेटण्याचा एक मार्ग आहे तो म्हणजे संतांचा मार्ग जर तुम्ही संताना आपलं केले तर सद्गुरू तुम्हाला भेटलेच म्हणून समजा. यामुळे संतांना काय आवडेल हे बघा? जसे भगवंताचे अखंड नामस्मरण आणि भगवंताचे अनुसंधान याशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट त्यांना या पेक्षा जास्त प्रिय नाही.
म्हणून आपल्या हृदयामध्ये नामाची ज्योत ही अखंड चालू ठेवा.मोक्ष-मुक्ति हवी असेल तर गुरुशिवाय उपाय नाही. गुरूने दाखवून दिलेल्या मार्गानेच साधना करने यावर ही हा एकची उपाय. हे ही की एकच साधना करून भगवंत सर्वांना उपयोगी पडत नाहीत.
खरंतर परमेश्वर म्हणजे कुणी व्यक्तिमत्त्व नसून एक अदृश्य भावना आहे.एक अशी भावना जी आम्हाला जगण्यास प्रेरणा देते, बळ देते.जगण्याचा मार्ग कितीही खडतर असला तरी ही भावना मात्र आम्हाला जगण्यास प्रवृत्त करते.सृष्टीचा जनक खरंतर वेळोवेळी आपली परीक्षा घेत असतो,आणि त्यातूनच तो आपलं कर्तुत्व सुद्धा बघतो त्यामुळे आपलं कर्तुत्व हे आरशासारखं स्वच्छ असला पाहिजे जेणेकरून सद्गुरू ची कृपादृष्टी आपल्या वर नेहमीच पडली पाहिजे.