
आम्ही बोललो असतो तर राष्ट्रद्रोह झाला असता – यशोमती ठाकूर
भारतामधील फोन टॅपिंग चे प्रकरण चांगलेच गाजत आहे यावरून देशाचे पंतप्रधान व भारतीय जनता पक्षाला चांगलेच घेतले जात आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्राईल च्या पंतप्रधानांना पत्र लिहून या पाठीमागे नेमकं सत्य काय आहे हे शोधले पाहिजे असे भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी म्हणाले होते. या वक्तव्यावरून महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी ट्विट करत भाजपवर टीका केली आहे.
यशोमती ठाकूर म्हणतात की “मोदींनी इस्रायली पंतप्रधानांना पत्र लिहून एनएसओच्या पेगॅसससाठी कोणाला पैसे दिले आहेत याविषयी सत्य शोधले पाहिजे. भाजपा नेते सुब्रह्मण्यम स्वामीच हे बोलतायत म्हणून बरं, आम्ही बोललो असतो तर राष्ट्रद्रोह झाला असता”. अशा आशयाचे त्यांनी ट्विट केले आहे.
हे प्रकरण फारच गंभीर असून याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी देशभरातून मागणी होत आहे. कारण वैयक्तिक माहितीची अफरातफर करून देशांमधील महत्वाच्या व्यक्तींचे फोन हॅक करून फार मोठ्या राजकीय घडामोडी घडून आल्या असू शकतात असा राजकीय वर्तुळामध्ये संशय व्यक्त करण्यात येत आहे.