उद्या राज्यासारखे देशभरात लॉकडाऊन लागल्यास…राऊतांचा खोचक टोला

0

मुंबई : महाराष्ट्रामध्ये करोनाने बाधित होणाऱ्या रूग्णांची संख्या अपेक्षेपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा आणि परिणामी आरोग्य सोयी-सुविधांचा गोंधळ उडालेला असून इंजेक्शन, बेड, रुग्णवाहिका, ऑक्सिजन, करोना लस अशा आरोग्य सुविधांची राज्यात अनेक ठिकाणी कमतरता जाणवत आहे.

दुसरीकडे करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे महाराष्ट्रासह देशामध्ये देखील दयनीय परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे करोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस नवे उच्चांक गाठत आहे.

या पार्श्वभूमीवर, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’चे संपादक, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना, ‘मला जे चित्र दिसतंय त्यानुसार महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशातच लॉकडाऊन लावले गेले तर आश्चर्य वाटायला नको,’ असे विधान करत, राज्यातील विरोधकांना खोचक टोला लगावला आहे.

तसेच त्यांनी, उ.प्रदेशमध्ये हरिद्वारला होणाऱ्या कुंभमेळ्याचे आणि प.बंगालमध्ये होणाऱ्या प्रचारसभांचे दाखले देत दावा केला आहे की, ‘इतर राज्यांच्या मानाने महाराष्ट्रात या गोष्टींवर नियंत्रण आहे. महाराष्ट्रामध्ये बाहेरील राज्यांमधून लोक येतात. तिथे काहीच नियंत्रण नाही आहे. त्यामुळेच राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.’ असे म्हटले आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.