
“अस असेल तर महाराष्ट्राचं किती कौतुक व्हायला हवं याचा विचार मी करतोय!” – जयंत पाटील
कोरोणाच्या दुसऱ्या लाटेमध्ये भारतामध्ये रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढत होती. देशातील परिस्थिती अधिकाधिक गंभीर बनली होती. अशावेळी देशातील राज्य सरकारांनी परिस्थिती कशी नियंत्रणात आणता येईल या दृष्टीने पावले उचलली. यामध्ये महाराष्ट्र, केरळ अशा आदी राज्यांनी कोरोनाच्या नियंत्रणासाठी उत्कृष्ट कामगिरी केली. ऑस्ट्रेलिया मधील वृत्तपत्राने व्यंगचित्र द्वारे भारत सरकारचे चांगलेच वाभाडे काढले होते, याला उत्तर म्हणून भारत सरकारने महाराष्ट्रातील काम कसे उत्कृष्ट आहे, चांगली परिस्थिती हाताळत आहेत अशा आशयाचे पत्र पाठवले होते.
उत्तर प्रदेशात निवडणुका जवळ आल्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश मध्ये बोलत असताना पुराच्या परिस्थितीवरून सरकारचे चांगलेच कौतुक केले आहे. या वरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चांगलाच टोमणा भारतीय जनता पक्षाला मारला आहे.
जयंत पाटील म्हणाले की “उत्तर प्रदेशची परिस्थिती काय होती याची माहिती जगभरातील वर्तमानपत्रांनी दिली. अशा परिस्थितीत उत्तर प्रदेश सरकारने कोविडची परिस्थिती चांगली हाताळली असलं म्हटलं जात असेल तर महाराष्ट्राचं किती कौतुक व्हायला हवं याचा विचार मी करतोय” !
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांची चांगलीच फिरकी जयंत पाटील यांनी घेतली आहे. नरेंद्र मोदी यांचे खोटं बोलणं त्यांनी उघड केलं आहे.