
झेपत नसेल तर राजीनामा द्या; पुण्याच्या महापौरांवर सुप्रिया सुळे भडकल्या!
पुण्यामध्ये आंबील ओढा हे प्रकरण महाराष्ट्र 12 मध्ये दोन दिवसांमध्ये चांगलेच चर्चेत आले आहे पुणे महानगरपालिकेने आंबील ओढ्यावरिल घरावर कारवाई करत घरे जमीन जमीनदोस्त केली आहेत. या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खा. सुप्रियाताई सुळे चांगल्याच आक्रमक झाले आहेत त्यांनी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर संताप व्यक्त केला आहे.
सुप्रियाताई म्हणाल्या की “पुण्याच्या महापौरांना कारभार झेपत नसेल, तर त्यांनी राजीनामा द्यावा, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. पुण्यातील आंबिल ओढ्यावरील कारवाईबाबत चौकशी व्हावी”, अशी मागणीही त्यांनी केली आहे. पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता असून त्यांनीच ही कारवाई केली आहे. या घटनेची चौकशी व्हावी. तसेच महापौरांनी याप्रकरणी उत्तर द्यावं. आणि हे सर्व झेपत नसेल तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असंही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या आहेत.
सुप्रिया ताई सुळे यांचा हा आक्रमक स्वभाव पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. सुप्रियाताई सुळे यांची देशभरामध्ये प्रश्न मांडणाऱ्या खासदार म्हणून एक वेगळीच ओळख आहे.