तर माझा मुलगा वाचला असता, स्वप्नीलची आई भावूक; विद्यार्थ्यांनी वेगळा विचार करु नये, सुप्रिया सुळेंचं आवाहन

0

स्वप्निल लोणकर यांना या विद्यार्थ्याने 29 जून रोजी पुण्यामध्ये आत्महत्या केली त्या आत्महत्येचे पडसाद उभ्या राज्यभर यामध्ये पडले इतकेच नव्हे तर पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा यावर प्रश्न उपस्थित केला गेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या तथा खासदार सुप्रियाताई सुळे यांनी स्वप्निल लोणकर यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली यावेळी सुप्रिया ताई यांनी त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला.

स्वप्निल च्या कुटुंबियांचं सांत्वन करत असताना सुप्रियाताई सुळे यांनी त्याच्या बहिणीच्या शिक्षणाची व नोकरीची हमी सुप्रिया सुळे यांनी घेतली. यावेळी स्वप्नील ची आई भाऊक झाल्याचं सर्वांनाच पाहायला मिळालं. आपल्या भावनांना वाट करून देत असताना त्या म्हणाल्या की जरा आठ दिवसांपूर्वी निर्णय झाला असतं तर माझा मुलगा वाचला असता. माझ्या मुलाने अनेकांना प्लाझमा दिला. अनेकांचे जीव त्यानं वाचविले मात्र तो वाचू शकला नाही, अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दिली.

सुप्रियाताई सुळे यांनी स्वप्निलच्या कुटुंबाचे सर्वस्वी जबाबदारी घेण्याची हमी दिली. स्वप्निलच्या बहिणीला एक मोबाईल देखील भेट देण्यात आला. सुप्रिया सुळेंनी यावेळी स्वप्नीलच्या कुटुंबावर असलेल्या कर्जाची माहिती घेऊन पूर्ण निपटारा करण्याचे आदेश दिले आहेत.

माध्यमांशी बोलत असताना सुप्रिया ताई यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केलं की “खासदार म्हणून मी तुमच्या सोबत चर्चा करायला तयार आहे. पण विद्यार्थ्यांनी कसलाही वेगळा विचार करु नये”, असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केला.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.