मीच राहणार नंबर- १ अक्षयच्या वक्त्यव्यावर, आमिरने दिली ‘हि’ प्रतिक्रिया.

0

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार त्याच्या अभिनयानेच नाही तर, त्याच्या फिटनेस आणि स्टंट्मुळे देखील लोकप्रिय आहे.अक्षय नेहमीच ना कोणत्या कारणामुळे समाज माध्यमांवर चर्चेचा विषय ठरतो. सध्या अक्षय कुमार चर्चेत येण्याचे कारण म्हणजे त्याने लोकप्रिय चॅट शो ‘कॉफी विथ करण’ मध्ये दिलेले उत्तर.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय चॅट शो ‘कॉफी विथ करण’च्या पर्वात अक्षयने हजेरी लावली होती. “कोणता लोकप्रिय अभिनेता लोकप्रियतेच्या शर्यतीत शेवट पर्यंत टिकून राहिल? असा प्रश्न करणने अक्षयला विचारला. त्यासोबत करणने त्याला ४ पर्याय देखील दिले. सलमान खान, शाहरूख खान, आमिर खान आणि तू म्हणजेच अक्षय कुमार.” त्याला उत्तर देत अक्षय म्हणाला, “जर शाहरूख, सलमान आणि आमिरने धुम्रपान करणे थांबवले तर ते राहतील नाही तर शेवटपर्यंत मी राहिलं.”

आमिरने अक्षयच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली कि, “मी धुम्रपान करण्यास सुरूवात केली याचा मला आनंद नाही, परंतू माझ्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जशी जवळ येते तसा मी चिंताग्रस्त होतो आणि मी धुम्रपान करण्यास सुरूवात करतो,मला असे वाटत नाही की धूम्रपान केल्याने कोणाच्याही अभिनय कौशल्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो, याच्यामुळे आपण अशक्त होऊ शकतो आणि आपल्या आरोग्यावर याचा परिणाम होऊ शकतो. मी सर्वांना धूम्रपान न करण्याची विनंती करतो आणि मी सुद्धा यावर माझं नियंत्रण ठेवत आहे.”

अक्षयच्या ‘सुर्यवंशी’  या चित्रपटाची तारीख गेल्या वर्षभरापासून करोनामुळे पुढे ढकलली जातं आहे. अक्षयला करोनाची लागण झाल्यामुळे त्याच्या आगामी चित्रपटांचे चित्रीकरण थांबले आहे. तर आमिरचा ‘लाल सिंग चढ्ढा’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.
अक्षयने दिलेल्या उत्तरावर आमिरने प्रतिक्रिया दिली ,पण बाकीचे अभिनेते अक्षयच्या या उत्तरला कशा प्रकारची प्रतिक्रिया देतील हे पाहणे देखील महत्वाचे ठरेल.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.