भाजपमधून बाहेर पडलं तर काय त्रास होतो हेच त्यांना दाखवायचंय; भुजबळांचा आरोप

0

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांची आज चौकशी करण्यात आली. तसेच त्यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केली आहे. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला शह देत स्थापन झालेलं महा विकास आघाडी सरकार व स्थिर करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने डीडी सीबीआय यांना कामाला लावला आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे याच्यावर करण्यात आलेली कारवाई ही राजकीय हेतुपूर्वक केलेली आहे अशी टीका करण्यात येत आहे.

एकनाथ खडसेंच्या चौकशीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी भाष्य करताना भाजपला लक्ष्य केलं आहे. ते म्हणाले की ‘हा अभाव तंत्राचा भाग आहे. भाजपमधून बाहेर पडलं तर काय त्रास होतो हे दाखवायचंय. यासोबतच, इतर पक्षात असलेल्यांना त्रास देऊन तो आपल्या पक्षात आला की त्याचे सगळे गुन्हे माफ केले जातात. राजकारणात सध्या असे प्रयोग सुरु आहेत. मात्र, खडसे आणि आम्ही सगळे जण त्यांना निश्चितपणे उत्तर देऊ,’ असा इशारा देखील छगन भुजबळ यांनी भाजपला दिला आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.