
देशाचे नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या दूरदृष्टी कोणाची माहिती उद्या देशभर आला आहे. नावीन्यपूर्ण गोष्टीची माहिती घेऊन, अभ्यास करून ते प्रयोग करत असतात. असाच अभ्यास करून त्यांनी व्हिएतनाममध्ये चिलापी माशांची पैदास मोठ्या प्रमाणावर केली जाते. हे मासे गाळातील घाण खातात. तसेच त्यांची वाढ झपाट्याने होते, हे समजल्या नंतर शरद पवार यांनी व्हिएतनाम मधून मासे आणून एकेकाळी उजनी धरणात सोडले होते, अशी आठवण राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी सांगितली.
वेळापूर येथे उत्तम जानकर यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यामध्ये शरद पवार आले होते त्यावेळी हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर शरद पवार राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांच्या गाडीत ते बसले. त्यांच्यासोबत आमदार यशवंत माने तसेच माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील हेही होते. विवाहस्थळी जाताना त्यांनी उपस्थितांसोबत उजनी धरणापासून जिल्ह्यातील साखर कारखान्यांपर्यंत अनेक विषयांवर चर्चा केली. यावेळी त्यांनी चिलापी माशांचा किस्सा सांगितला.
शरद पवार यांनी सांगितलेल्या या गोष्टी वरून त्यांचा असणारा दूरदृष्टी कोण दिसून येतो. विशेष म्हणजे सर्वांनीच हा किस्सा ऐकल्या नंतर तोंडात बोटे घातली!