
मी पस्तीस वर्षे हटत नसतो, आ.निलेश लंकेनी सांगितला राजयोग!
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके यांच्या कामगिरीची महाराष्ट्र राज्यात क्रेझ आहे. आमदार कसा असावा, तर निलेश लंके सारखा असावा अशी चर्चा महाराष्ट्र मध्ये होताना दिसत आहे. कोरोनाच्या कालावधीमध्ये त्यांनी केलेले मदत कार्य हे फार मोठे आहे. आपल्या सर्वसामान्य स्वभावाच्या जोरावर ते अविरत काम करताना दिसून येतात. त्यांचा असलेला लोकसंपर्क फार मोठा आहे.
निलेश लंके बोलताना म्हणाले की ”मला पस्तीस वर्षे राजयोग आहे. माझ्या आरोग्याचा विचार करणाऱ्यांनी चिंता करू नये. कोरोनाच्या संकटात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, तरी काही महाभागांनी संकटात मदत करण्याऐवजी त्रास दिला. अशा प्रकारे त्रास देणाऱ्या व गोरगरिबांची लूट करणाऱ्यांचा परमेश्वरच कार्यक्रम केल्याशिवाय राहाणार नाही,” असा टोला आमदार नीलेश लंके यांनी विरोधकांना मारला.
निलेश लंके यांच्या माणुसकीची चर्चा सर्वत्र होताना दिसते त्यांच्या कोविल सेंटरला राज्यातून नव्हे तर परदेशातून सुद्धा मदतीचा ओघ सुरु होता ही त्यांची विश्वासार्हता आणि काम करण्याची अनोखी शैली आहे. मतदारसंघातील विकास कामांच्या बाबतीत ते कायम प्रयत्नशील असतात.
निलेश लंके यांनी कोरोना काळात आलेल्या दुःखद व धक्कादायक आठवणी कथन करताना भावनिक झाले होते. त्यांनी बोलत असताना दुःखद गोष्टींच्या बरोबरच अडचणींचा सुद्धा पाढा वाचून दाखवला तसेच लोकांकडून मिळालेल्या प्रेमाबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले.