कोणालाही भेटलो नाही, अफवांनी राजकारण हलत नाही, अफवा पासरावणाऱ्यांचे कारखाने दिवाळखोरीत निघतील!

0

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फारच नाट्यमयरित्या राजकीय घडामोडी सातत्याने घडताना दिसून येतात आरोप-प्रत्यारोप टीका टिप्पणी अशा गोष्टी सुरू असतात. मात्र याच बरोबर अफवा नावाच्या आयुधाचा सुद्धा वापर खुबीनं होत आहे. भाजप नेते आशिष शेलार आणि संजय राऊत यांच्या भेटीच्या चर्चा माध्यमांच्या मध्ये फारच रंगल्या याबाबतीत संजय राऊत म्हणाले “मी काल कुणालाही भेटलो नाही. या सर्व अफवा आहेत. अशा अफवांनी राजकारण हलत नाही. अफवा पसरवण्याचे कारखाने सुरू आहेत. ते दिवाळखोरीत निघतील, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

याच बरोबर संजय राऊत म्हणाले “अफवा पसरवल्या जातात. ज्यांना माझ्यापासून वेदना होतात, यातना होतात असे लोक अफवा पसरवत असतात. महाराष्ट्रात दोन वेगळ्या पक्षाचे नेते भेटले तर आश्चर्य वाटण्याचं कारण काय?, असा सवाल करतानाच मी काल दिवसभर कामात होतो. कुणालाही भेटलो नाही. तरीही अफवा पसरवण्यात आल्या. अशा अफवा पसरवल्याने राजकारण हलत नाही, अस्थिरही होत नाही. महाराष्ट्र सरकारला अडचणीही होत नाही. पण अफवा पसरवण्याचे कारखाने दिवाळखोरीत निघतील, असं राऊत म्हणाले.

शिवसेना नेते संजय राऊत आक्रमक स्वभावासाठी ओळखले जातात. या सर्व गोष्टींचे खंडन करत त्यांनी अफवा पसरवणाऱ्या वरती तोफ डागली आहे. ते म्हणाले की अफवा पसरवण्याचे कारखाने दिवाळखोरीत निघतील असे म्हणाले.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.