भाई जयंतरावांच्या इन्कम टॅक्‍सच्या नोटीसा मला येतात : जयंत पाटील यांनी सांगितला किस्सा

0

सारख्या नावाच्या दोन व्यक्ती एका गावात असल्या की फक्त पोस्ट मास्तर ची दमछाक होते असे नाही तर ज्यांना हे पत्र मिळालं त्यांची पण दमछाक होते. शाळा, कॉलेज, पोस्ट, बँक, ग्रामपंचायत दाखला असल्या गोष्टीच्या वेळी त्रयस्त व्यक्तीचा नेमके कोणाला हे पत्र, कागदपत्र द्यायचा यावरून नक्कीच गोंधळ झाला म्हणून समजा. सारखं नाव आणि आडनाव असणाऱ्या प्रसिद्ध गावातील व्यक्तींची ही समस्या सर्वश्रुत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी असाच किस्सा भाषणात सांगितला होता. ते कवठेएकंद (ता. तासगाव) येथे सिद्धराज शेती पाणीपुरवठा संस्था रौप्यमहोत्सव वर्ष सोहळा या ठिकाणी बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार शरद पवार उपस्थित होते त्या वेळी त्यांनी सारखे नाव असण्याचा काही दिवसांपूर्वी एक किस्सा सांगितला.

शेकापचे आमदार जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्या नामसाधर्म्या बद्दल राष्ट्रवादीचे जयंत पाटील म्हणाले” म्हणाले की शेकाप च्या जयंत पाटलांच्या नोटिसा सारखे नाव असल्याने मला येतात”. हे ऐकुन उपस्थितांच्या मध्ये हास्याचे फवारे उडाले. सारख्या नावाने सगळेच परेशान असतात मात्र महाराष्ट्रातील नामवंत नेते सुद्धा या गोष्टीने त्रस्त आहेत हे ऐकुन सगळ्यांना विशेष वाटले!

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.