
मी सुशांत सिंह राजपूत नाही, मी मरणार नाही ; KRK चा नाव न घेता सलमानवर निशाणा!
बॉलीवुड अभिनेता कमाल राशिद खान सतत चर्चेत पाहायला मिळतो. सतत कोणाशी नाही कोणाशी पंगा घेत तो सोशल मीडियामध्ये अॅक्टिव असतो. नुकतचं KRK ने सोशल मीडियावर एक ट्विट केले आहे ते ट्विट सध्या चांगलचं लोकांत व्हायरल होतंय.
KRK म्हणाला की ‘बॉलिवूडमधील गुंडा भाईजान मी ऑउटसायर जरी असलो तरी मी १०० टक्के दुसरा सुशांत सिंह राजपूत नाही बनणार हे लक्षात घे. मी मरणारही नाही आणि बॉलिवूडचा विजयही होणार नाहीय. यावेळी बॉलिवूडचा पराभव होणार. कारण यावेळी बॉलिवूडने चुकीच्या व्यक्तीसोबत पंगा घेतला आहे.’ असं KRK त्याच्या ट्वीटमध्ये म्हणाला.
हे विधान KRK ने नाव न घेता सलमान खानवर व बॉलिवूडवर केलेलं आहे. त्याच्या मध्ये आणि सलमान खान मध्ये सध्या चांगलेच वाग्युद्ध पेटल्याचे दिसून येत आहे. तो अजून एका ट्विट मध्ये म्हणाला होता की ‘बॉलिवूडवाल्यांनो एक गोष्ट नीट लक्षात ठेवा. आम्ही पश्चिम युपीचे लोक कधी कुणाला घाबरत नाही आणि कधी हार मानत नाही. तुमचं आव्हान स्विकार आहे. आता नेट निकाल लागणार’ अशा आशयाचं ट्विट कमाल आर. खानेन केलंय.