“मला हिंदू असल्याची लाज वाटते”;स्वरा भास्कर च्या ह्या वक्तव्यांने देशात खळबळ माजवली..!

0

बॉलिवूड ची नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे स्वरा भास्कर! खरंतर ती नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सोशियल माध्यमातून खूप चर्चेत असते. स्वरा भास्कर सोशल मीडियाच्या माध्यमातून बिनधास्तपणे सामाजिक विषयांवर तिचे मत मांडताना दिसते.

पण बऱ्याच वेळी तिला या गोष्टीमुळे सोशल मीडियावर ट्रोल देखील होण्याची वेळ येते. पण स्वरा मात्र तरीसुद्धा शांत बसत नाही. आता नुकताच स्वरा भास्कर आर्यन खान प्रकरणी चर्चेत आली होती,आणि आता पुन्हा नव्याने ती तिच्या एका पोस्ट मुले केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.

स्वरा भास्कर ने नुकतंच हिंदूविरोधी एक वक्तव्य केले आहे. यात तिने “मला हिंदू असल्याची लाज वाटते,” असे म्हटले आहे. यामुळे तिला सोशियल माध्यमातून प्रचंड ट्रोल केलं जातं आहे.खरंतर वस्तुस्थिती अशी आहे की स्वरा भास्करने हरियाणातील गुरुग्राम या ठिकाणी घडलेल्या एका घटनेवर मत मांडताना हिंदूविरोधी वक्तव्य केले आहे.

या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ स्वराने तिच्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओत ही संपूर्ण घटना कैद झाल्याचे दिसत आहे. “एक हिंदू म्हणून मला लाज वाटते,” असे लिहित स्वराने हा व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या या वक्तव्यानंतर तिला पुन्हा ट्रोल केले जात आहे.

हिंदूविरोधी वक्तव्य केल्याने पुन्हा एकदा ट्रोलर्सने तिला धारेवर धरल्याच चित्र दिसत आहे.त्यांनतर लगेच तासाभरापूर्वी स्वराने आणखी एक ट्वीट करत त्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. “काही इतर धर्मीय शांततेने प्रार्थना करत असताना जेव्हा काही गुंड देवाच्या नावाचा वापर करुन त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात.

तेव्हा तो माझ्या देवाचा आणि माझ्या हिंदू धर्माचा अपमान असतो. मला अशा लोकांची लाज वाटते. एक हिंदू म्हणून मला अशा लोकांची लाज वाटते. जे आमच्या देव आणि धर्मात गुन्हे करतात,” असे आणखी एक ट्वीट स्वराने केले आहे.

यानंतर मात्र स्वरा च्या या दोन्ही वक्तव्यानंतर सोशल मीडियावर स्वराला ट्रोल केले जात आहे. तसेच सोशल मीडियावर स्वरा भास्कर असा ट्रेंडही पाहायला मिळत आहे. यापूर्वीही स्वराने अनेकदा हिंदू-मुस्लिम या मुद्द्यांवर ट्वीट करत स्वत:ची मतं मांडली आहेत.

त्या व्हिडीओ मध्ये घटना अशी आहे की शुक्रवारी २२ ऑक्टोबर रोजी हरिणायातील गुरुग्राम या ठिकाणी १२-A सेक्टर मध्ये एक खासगी मालमत्ता असलेल्या ठिकाणी काही मुस्लिम शांततेत नमाज पठण करत होते. मात्र त्याचवेळी बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी तिथे विनाकारण गर्दी केली.

यावेळी जमलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ‘जय श्री राम’च्या घोषणाही दिल्याचे बोललं जात आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर रॉकेट च्या वेगाने व्हायरल होत आहे. या घटनेमुळे या परिसरात तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे यावेळी काही पोलिस अधिकारीही तिथे बॅरिकेट्स लावून तैनात असल्याचे पाहायला मिळत आहे. स्वराने हाच व्हिडीओ शेअर करत हिंदूविरोधी वक्तव्य केले होते.खरंतर आता नेमकं स्वरा ला या व्हिडीओ च्या माध्यमातून कोणता संदेश द्यायचा आहे हे मात्र तिने स्पष्टपणे जाहीर केलं नाही.

हिंदू-मुस्लिम एकता जपणाऱ्या धर्मनिरपेक्ष देशात अशी धर्मविरोधी कृत्य घडतात ह्यावर मात्र तिने त्या पोस्ट च्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.ऐन दिवाळी जवळ आली असताना तिचं हिंदूविरोधी वक्तव्य करणं तिच्या चित्रपटावर याचा काही परिणाम करणार का,हा मात्र आता तिच्या साठी एक चिंतेचा प्रश्नच आहे..!

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.