‘अजितदादा सामान्य जनतेसाठी उपलब्ध असतात, हे मी भाजपचा असून मान्य करतो’

0

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे हे काल मराठवाडा दौऱ्यावर होते. बीड येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात तब्बल २ तास ३० मिनिटे बैठक झाली. या बैठकीच्या नंतर ताफा निघाला असता कोविडच्या काळात काम केलेल्या कंत्राटी कर्मच्याऱ्यांनी निवेदन घेऊन भेटू दिले नाही म्हणूत अजित पवारांचा व राजेश टोपे याच्या गाडीचा ताफा अडवल्याने मोठा गोंधळ झालेला. पोलिसांना परिस्थिती हातात आणण्यासाठी कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांवर लाठीचार्ज देखील केला.

भारतीय जनता पार्टीच्या पंकजा मुंडे, आ. सुरेश धस, निलेश राणे यांनी टीका केली. मात्र महत्त्वपूर्ण मुद्दा लक्षात आणून देत भाजपच्या एका नेत्याने मात्र अजित पवार यांच समर्थन केलं आहे.

अवधूत वाघ म्हणाले की “आशा वर्कर्सनी अजितदादांचा चा ताफा अडवून निवेदन देण्याचा प्रयत्न व दादांनी ते न घेताच निघून जाणे अशा स्वरूपाचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे. खरं तर ताफा अडवून निवेदन देणे हे अयोग्य. दुसरेही मार्ग आहेत. अशा वेळी नेत्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार ? काही बरेवाईट झाले तर? असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच ते पुढे म्हणाले की…

“मी दादांना ओळखतो. सकाळी ७ पासून ते लोकांना भेटतात. जे जे शक्य आहे त्याची त्वरित दखल घेतात. त्यांच्या कार्यालयात किंवा निवासस्थानी जाऊन निवेदन द्यायला कोणी अडवल आहे? राजकीय विरोधक असले तरी अजितदादा सामान्य जनतेसाठी उपलब्ध असतात हे मी जरी भाजपा चा असलो तरी मान्य केलेच पाहिजे”. अशा आशयाचे त्यांनी ट्विट केलं आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.