
“सौ चुहे खाके बिल्ली हज को चली” जयंत पाटील यांचा भाजप वरती घणाघात!
महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षण मुद्द्यावरून भाजप सरकार चांगलेच आक्रमक झाले आहे. त्यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपने राज्यभर आंदोलन पुकारलं आहे. महाराष्ट्रातील बहुतांश भागात भाजप नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको, चक्काजाम करून आंदोलन करत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावरून चांगलाच निशाणा भाजप वरती साधला आहे. जयंत पाटील म्हणाले की “राज्यातील ओबीसी नेतृत्व ठरवून मोडीत काढणारा भारतीय जनता पक्ष आज राज्यभर ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करत आहे”. तसेच त्यांनी एका मराठी म्हणीच्या माध्यमातून चांगलाच चांगलाच टोला लावला आहे. “सौ चुहे खाके बिल्ली हज को चली” अशी नेमकी टिप्पणी जयंत पाटील यांनी केली आहे.