देवेंद्र फडणवीसांना व्हिडीओ फुटेज मिळाले कसे. ….. घड्याळ्यातील कॅमेरातून स्टींग ऑपरेशन, प्रविण चव्हाण यांचा खुलासा.

0

देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयातील १२५ तासांचे व्हिडिओ फुटेज सादर केले होते.या व्हिडिओजच्या आधारे देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर अनेक गंभीर आरोप केले होते. हे व्हिडिओ देवेंद्र फडणवीस यांना मिळाले कसे? याचा खुलाशा विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी केला.

विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांना मोकामध्ये अडकवण्याचा कट रचल्याचा आरोपानंतर चव्हाण प्रथमच माध्यमांसमोर आले. चव्हाण यांनी हे संपूर्ण प्रकरण कसे घडले असावे याचा देखील त्यांनी उलगडा केला. ते म्हणाले, जळगावमधील तेजस मोरे हा आपला अशिल आहे. त्याने आपणास एक घड्याळ भेट दिले होते. ते घड्याळ कार्यालयाच्या भिंतीवरील लावले होते. या घड्याळात कॅमेरा बसवून हे स्टिंग ऑपरेशन केले असण्याची शक्यता आहे.

रेकॉर्डिंग मॅन्यूपुलेट
सर्व रेकॉर्डिंग मॅन्यूपुलेट आहेत. यातील आवाज आपला नाही. तेजस मोरे याला आपण जामीन मिळवून दिला होता. त्याचे पैसेही त्याच्याकडे बाकी आहेत. तो जळगाव येथील रहिवासी आहे. त्याने एक दिवस भिंतीवरचे घड्याळ भेट दिले. ते त्याने आपल्या कार्यालयात समोरच्या भिंतीवर बसविले. त्यात कॅमेरा बसवून चित्रीकरण केले असण्याची शक्यता आहे. तो जळगाव येथील असल्याने त्याला मॅनेज केले असावे असे आपणास वाटते. याबाबत आपण संपूर्ण कायद्याचा अभ्यास करून स्वतः गुन्हा दाखल करणार आहोत.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.