मुख्यामंत्र्यांचे उद्गार! महाराष्ट्र शोकमग्न आहे!

0

नाशिक : नाशिक शहरासह ग्रामीण भागातही करोना बाधित रुग्णांची संख्या वाढली असून, प्रशासनामार्फत रुग्ण नियंत्रित करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. करोना नियंत्रणासाठी कडक निर्बध देखील लावले गेले आहेत आणि लसीकरणही जोरात सुरू आहे.

मात्र तरीही नाशिकच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामानाने ओक्सिजन बेड्स, व्हेन्टीलेटर्स, यांची कमतरता जाणवत आहे.

अशी परिस्थिती असताना, आज सकाळी १२.३० वा. जुना नाशिक भागातील डॉ. झाकीर हुसेन महापालिकेच्या हॉस्पीटलमधील १३ हजार लिटर ऑक्सिजन क्षमता असलेल्या टाकीला गळती लागली आणि टाकीमधून लाखो लिटर ओक्सिजन हवेत पसरला.

मात्र यात रुग्णालयातील ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांपैकी २४ करोना बाधित रुग्णांना ऑक्सिजन अपुरा पडल्याने, त्यांचा पुढच्या अर्ध्या ते एक तासात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

या घटनेनंतर सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त होत असून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही यावर आपली शोकमग्न प्रतिक्रिया दिली आहे.

या दुर्घटनेस जे कुणी जबाबदार असतील त्यांची गय केली जाणार नाही, पण या दुर्दैवी घटनेचे राजकारणही कुणी करू नये. संपूर्ण महाराष्ट्रावर हा आघात आहे. नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे!” अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

तसेच, “करोनाच्या संकटामुळे देश दुर्दैवाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. एकंदरीत करोनाशी विषम प्रकारची लढाईच सुरू आहे. कुठे ऑक्सिजन नाही, कुठे औषधे नाहीत, कुठे बेडस् नाहीत. त्याअभावी रुग्णांचे हाल व मृत्यू होत आहेत. अशात नाशिक महानगरपालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेची बातमी धक्कादायक आहे, मन हेलावणारी आहे, अशी प्रतिक्रियी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.