
आर्युवेदामध्ये गुळवेलाला अनन्यसाधारण महत्व आहे. गुळवेलाचा वापर अनेक आजारात केला जातो. गुळवेलाचा वापर करण्याची काही प्रमुख कारणे म्हणजे गुळवेलात अँटी आॅक्सीडंट, लोह, तांबे, कॅल्शियम, जस्त, फॉस्फरस, मँगेनिज असते. गुवेलचा काढा कसा बनवावा व त्याचे उपयोग काय आज आपण पाहणार आहोत.
गुळवेलाचा काढा बनविण्यासाठी गुळवेलाचा बोटभर लांब तुकडा ठेचून घ्या. त्यानंतर एका पातेल्यात अंदाजे २ ग्लासभर पाणी घ्या. यात ठेवलेला गुळवेलाचा तुकडा घालून ते मंद आचेवर उकळायला ठेवा. दोन ग्लासचे एक ग्लास पाणी तयार होताच काढा बंद करा. हा काढा गाळून घ्या गुळवेलाचा हा काढा महिन्यातील आठ दिवस सेवन करा. गुळवेलाच्या काढ्याचे फायदे.
१) बदलत्या हवामानात सर्दी, खोकला, ताप अशा समस्येत गुळवेलाचा काढा घेतल्याने आराम मिळतो.
२) गुळवेलाचा काढा घेतल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पचनशक्ती सुधारते.
३) किडनी आणि यकृतातील विषारी पदार्थ बाहेर येण्यास मदत मिळते. तसेच रक्तही शुध्द होते.
४) चेहऱ्यावरील सुरकुत्या, मुरुम नाहिशी होतात. सांधेदुखी बरी होते. रक्तातील साखरेच्या पातळीत होणारी वाढ रोखता येते.
गुळवेलाच्या काढ्याचे अति सेवन करू नये. शक्यतो तज्ञांचा सल्ला घ्यावा.