कोरोना बाधिताच्या संपर्कात आल्यास किती वेळात होता कोरोना संसर्ग

0

संपूर्ण देशातच कोरोना स्थिती बिकट होत असून कोरोना रुग्ण संख्या दिवसागणिक वाढत आहे तसच मृत्युदरही वाढत आहे.आज एका दिवसात देशात २लाख ७३९इतकी कोरोना रुग्णसंख्या नव्यान वाढली आहे.कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट वेगाने पसरतेय.देशात कोरोनाचा दुसरा स्ट्रेंथ आढळण्याबरोबरच काही ठिकाणी ब्रिटनचा स्ट्रेंथही आढळला आहे.परिणामी हा विषाणू स्वतामध्ये सातत्यान बदल करत असून लागण झाल्यानंतर त्याची लक्षण वेगळी आढळत आहेत.

पहिल्या कोरोना लाटेत म्हणजेच गतवर्षी कोरानाची लागण झाल्यावर सर्दी,ताप,घसा खवखवणे, खोकला तसेच अत्यवस्थ झाल्यास श्वास घेण्यास त्रास अशाप्रकारची लक्षण आढळून येत होती.यंदा दुसरी लाट या लक्षणांबरोबरच तोडांची चव जाणे,वास न येण किंचित ताप अशी लक्षण दाखवत आहे.तर काही ठिकाणी त्वचा रोग किंवा उलटी अशीही लक्षण आढळत आहेत.

विषाणू म्हणजे प्रोटीनचा थर असून तो एका शरीरातून दुसरीकडे जाताना म्युटेशन म्हणजेच बदल करून घेतो.कठीण पृष्ठभागावर हा विषाणू १०ते १२ तास सक्रिय असतो,परिणामी तेथे आपला संपर्क आल्यास तो त्या भागाकडून नाकाकडे प्रवास करत शरीरात जातो.सातत्यान हात त्यासाठीच धुवावे अस सांगतात कारण आपण हातानच सर्वात जास्त स्पर्श करतो.सद्या एक मास्क पुरेसा नाही अस डॉक्टरांच म्हणण असून किमान दोन पदरी मास्क वापरावेत अस आवाहन करण्यात येत आहे.

देशात सध्या ६०टक्के वेगाने कोविड साथ पसरत असून मागील वर्षी कोराना बाधिताच्या संपर्कात आल्यास कोरोना लागण होण्यास१०मिनिटांचा अवधी लागत होता यावर्षी या लाटेत हे प्रमाण जर कोरोना रुग्णाच्या संपर्कात आपण आलो तर आपल्याला केवळ १मिनिटात संसर्ग होतो.परिणामी आधी ३०ते४० टक्के लोकांनाच लागण होत होती आता हेच प्रमाण ७०ते ८०टक्के झाल आहे.यासर्वांमुळेच राज्यासह देशात कोरोना रुग्ण वाढू लागले आहेत.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.