हेअर कटसाठी 150 रुपये घेणारा नाभिक 378 लक्झरी कार कशा घेतो?

0

बंगळूरू : नाभिक हा दैनंदिन जीवनातील महत्वाच घटक आहे.महिन्यातून एकदातरी संपर्कात येणारा हा घटक पूर्वी पारावर बसून केस कापणे आणि दाढी करणे असे काम करत होता.कालानुरूप तो आणि त्याचा व्यवसाय बदलला.दुकान ते सलून असा त्याचा प्रवास झाला असून सलूनमध्ये आकारण्यात येणारे दरही थक्क करणारे आहेत.परंतु एका 150 रुपये हेअरकट साठी घेणार्या एका धडपड्या नाभिकाने 378 लक्झरी कार घेतलेल्या आहेत.बंगळूर स्थित रमेश बाबू या नाभिकाने ही कमाल केली असून तो नेमक काय करतो वाचा सविस्तर

रमेश बाबू अत्यंत गरिबीतून वर आलेला आहे,शिक्षणासाठी त्याने पहिली नोकरी पकडली ती म्हणजे घरोघरी वर्तमान पत्र टाकायची पितृछत्र नसलेल्या रमेश बाबूची आईही दुसऱ्यांच्यात घरकाम करत असे.नंतर रमेशबाबूने स्वताचा पारंपारिक नाभिकाचा व्यवसाय सुरू केला.दुसर्याकडे नोकरी करतच त्यांनी हा व्यवसाय सुरू ठेवला.दरम्यान 1993 साली रमेश बाबूने स्वताच्या खाजगी वापरासाठी बँकेचे कर्ज काढून मारुती ओमनी व्हॅन खरेदी केली.परंतु या कारचे हप्ते त्यांना फाटत नव्हते यावेळी त्यांची आई घरकाम करत आसलेल्या नंदीनी आंटीने त्याला कार भाड्याने देण्याचा सल्ला दिला.रमेश बाजुने तेच केल व त्याचा कार भाड्याने देण्याचा व्यवसाय भरभराटीला आला.बंगळूरसह आसपासच्या इतर भागातही त्यांच्या गाड्यांना मागणी आहे.विवाह तसेच इतर कार्यक्रम, ट्रिप यासाठी या कार भाड्याने नेल्या जातात.

ओमनीनंतर एक वर्षाने त्यांनी 4 कोटींची एक कार खरेदी केली व डिलिव्हरीनंतर 6 तासातच तिचा चक्काचूर झाला, परंतु विमा रकमेने त्यांना दिलासा दिला.परिणामी अशा प्रसंगातूनच व्यवसायाच्या खाचाखोचा कळल्याचे रमेश बाबू सांगतो.त्याच्या ताफ्यात रूल्स राईस, आजची, बी एम डब्ल्यू, जाग्वार या कार्सचा समावेश आहे.रोल्स राईस कारच एका दिवसाच भाड 50000 रुपये असून डिपॉझीट वेगळ घेतल जात.अनेकदा शूटिंगसाठीही या कार भाड्याने नेल्या जातात.रमेश बाबुला 8 कोटी रुपयांची स्ट्रेच लिमोझीन घेण्याची इच्छा आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.