राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या कार्यालयात भाजप पदाधिकाऱ्यांचा पाहुणचार!राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या कार्यालयात भाजप पदाधिकाऱ्यांचा पाहुणचार!

0

“राजकीय मतभेद असावेत मनभेद असू नयेत”. असे बोलले जाते याचीच प्रचिती पुणे जिल्ह्यामध्ये आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवीन झालेल्या पक्ष कार्यालया मध्ये भाजपच्या नेत्यांनी भेट देत पाहुणचार घेतला. पुण्यातील राजकीय संस्कृतीचे यानिमित्ताने महाराष्ट्राला दर्शन झाले.

जरी महापौरांसह भाजप पदाधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष यांच्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदर राजकीय आरोप – प्रत्यारोप सुरू असतील. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवाजीनगर येथील नुतन पक्ष कार्यालयाचे उद्घाटन काही दिवसांपूर्वी झाले. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पक्ष कार्यालयात चहा – पानासाठी भाजपच्या महापालिकेतील आणि शहराच्या पदाधिकार्‍यांना शुक्रवारी सायंकाळी निमंत्रित केले होते त्यांच्या शब्दांचा मान ठेवत महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट यांच्यासह भाजप पदाधिकार्‍यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नुतन कार्यालयाला भेट देऊन पाहुणचार घेतला व राजकीय खिलाडूवृत्ती तथा मोठेपणा दाखवत भेट दिली.

पक्ष कार्यालयातील या चहा – पानाला विरोधी पक्षाच्या मान्यवरांच्या मध्ये चांगल्याच गप्पा गोष्टी हस्य रंगले. राष्ट्रवादी आणि भाजप पदाधिकारी यांच्यात सातत्याने कलगीतुरा सुरूच असतो. मात्र, हे राजकीय वैर सोडून या मंडळींनी चहापानाच्या निमित्ताने केलेली दोस्ती चर्चेला विषय ठरला आहे

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.