
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कार्याचा सन्मान, त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले!
महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाच्या कालावधीमध्ये जबाबदारीने केलेलं काम उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. सातत्याने प्रश्न सोडवण्यासाठी आरोग्याचे विषय मार्गी लावण्यासाठी ते प्रयत्नशील असायचे. आपल्या आईच्या मृत्यूनंतर सुद्धा अवघ्या तीन दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्याच्या सेवेसाठी ते दाखल झाले होते. कोरोनावर मात करण्यासाठी अहोरात्र त्यांनी कष्ट घेत जबाबदारी ने काम केलं.
कर्तव्यदक्ष मंत्री असा चेहरा असणारे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा मोठा सन्मान करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत हँडल वरून पण या बद्दल माहिती देण्यात आली आहे. ट्विट मध्ये म्हणाले आहेत की “जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने विधिमंडळाच्या कामकाजात प्रयत्नशील राहून उत्तम कामकाज केल्याबद्दल राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांना २०१६-१७ वर्षासाठीच्या उत्कृष्ठ भाषण पुरस्काराने मंगळवारी गौरविण्यात आले”.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा केलेला सन्मान महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असा सन्मान आहे. विविध क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामाची ही पोचपावती आहे असा सगळीकडेच कौतुकाचा सूर आवळला जात आहे.