माननीय शरद पवारांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंची इच्छा क्षणात केली पूर्ण

0

इंदापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि देशाचे ज्येष्ठ नेते, सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले शरद पवार सतत आपल्या मंत्र्यांच्या संपर्कात असतात.कार्यकर्ते,मंत्री,आमदार,खासदार यांना सातत्याने मार्गदर्शन करत असतात.असाच एक इच्छापूर्ती कार्यक्रम शरद पवारांनी पार पाडला आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व कार्यकर्त्यांना सुखद आनंद मिळवून दिला.

कोरोना संकट असल्यान राज्यात पुण्यासह सगळीकडेच रुग्णसंख्या वाढत आहे, अशावेळी राज्यात होत असलेल्या विकास कामांनाही सुरुवात करण्याचे कार्यक्रम होत आहेत,सातत्यान चालणार्या या प्रक्रियेला ब्रेक देता येत नसल्याने मंत्र्यांनी आपली कामे सुरू ठेवली आहेत.परंतु गर्दी टाळण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्वच नेते प्रयत्न करत असून पवार साहेबांनीही त्याची काळजी घेतली आहे.

इंदापूरमध्ये सुरू असलेल्या विकास कामांचा उदघाटन समोरह राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया ताई सुळे व शरद पवार यांच्या हस्ते ठरवण्यात आला होता.राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणें यांनी यासाठी जय्यत तयारी केली होती,परंतु कामाची व्यस्तता तसेच नागरिकांच्या काळजीतून शरद पवार व सुप्रिया ताई सुळे या कार्यक्रमास उपस्थित राहू शकत नसल्याचे सांगितल गेल.परिणामी दत्तात्रय भरणेंनी हा कार्यक्रम आॅनलाईन केला.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंनी शरद पवार व सुप्रिया ताई सुळेंना आॅनलाईन पध्दतीने कार्यक्रमास आॅनलाईन पध्दतीने उपस्थिती लावावी तसेच उदघाटन करून नागरिकांना व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावे अशी इच्छा व्यक्त केली.शरद पवारांनी भरणेंच्या या इच्छेला मान देत कॅमेरासमोर येत सुप्रिया ताई सुळेंसह इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील विकास कामांचे आॅनलाईन उदघाटन केले.पवार साहेबांनी तालुक्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या यामुळे उपस्थित लोकांत व कार्यकर्त्यांत उत्साह संचारला.तसेच सगळ्यांची इच्छापूर्ती झाली.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.