
मा.शरद पवारांनी सुशील कुमार शिंदेंना विचारल “तु पार्लमेंटला उभा राहशील का?”आणि सुशील कुमार शिंदे आमदार झाले
माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे आणि मा.शरद पवार विद्यार्थीदशेपासूनच मित्र आहेत.शरद पवारही मुख्यमंत्री राहिलेले आहेत.इतकच काय सुशील कुमार शिंदेंनी नाटकातही काम केलेली आहेत.गोरेगोमटे सुशीलकुमार नाटकात स्त्री भूमिका करत असत.सुशीलकुमारांच पाळण्यातल नाव ज्ञानेश्वर असून नाटकासाठीच त्यांनी सुशीलकुमार हे नाव घेतल आणि तेच पुढे रूढ झाल.
सुशील कुमार शिंदेंचा जन्म 4सप्टेंबर 1941 रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील माकडाची उपळाई या गावी झाला.सुशील कुमार शिंदेंनी शाळा शिकतच कोर्टात नोकरी सुरू केली त्यावेळी ते आठविला होते.पुढे जिद्दीने त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केल आणि 1965 साली महाविद्यालयिन शिक्षणही पूर्ण केल ते बी. ए झाले.पुढे आय.ए एस होण्याच्या विचाराने ते पुण्यात दाखल झाले.राजकारणात आपण नेतृत्व करू शकतो हा विचारच त्यांच्या डोक्यात नव्हता पुण्यात आल्यावर सुशीलकुमार विद्यार्थी चळवळीत भाग घेत होते,या चळवळीत मा.शरद पवार आघाडीवर होते.यानिमित्तानेच सुशीलकुमार आणि शरद पवारांची पहिली भेट झाली व यातच पवारसाहेबांनी सुशीलकुमारांचे नेतृत्व गुण हेरले.
दरम्यान सुशीलकुमार 1965 साली मुंबईत सी. आय. डी विभागात पोलीस म्हणून रूजू झाले त्यांनी त्याच रितसर प्रशिक्षणही घेतल.परंतु एल एल बी करायच त्यांच स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हत परीणामी नोकरी करतच ते वकिली परिक्षेला बसले.शरद पवार मात्र पूर्ण वेळ चळवळ आणि राज्याच्या समाजकार्यात झोकून देऊन काम करू लागले.सुशीलकुमार वकील झाले व मुंबईत यशस्वीपणे व्यवसाय करू लागले.लेबर विंगचे काम करताना सुशील कुमार शिंदेंचा संबंध श्रीराम लेले या काँग्रेस कामगार कार्यकर्त्याशी आला आणि त्याच्या घरी येण जाण सुरू झाल,तेथेच शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदेंची परत भेट झाली आणि पवार साहेबांनी सुशीलकुमारांना काँग्रेस फोरम फॉर सोशॅलिझमच निमंत्रक पद दिल आणि सुशीलकुमार शिंदे यांचा राजकीय प्रवास सुरू झाला.सुशील कुमार शिंदेंना शरद पवारांनी विचारल की,” तु पार्लमेंटला उभा राहशील का? “आणि सुशीलकुमारांच तिकीट नक्की झाल.
1972 च्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर (करमाळा तालुका) मतदार संघाच तिकीट काँग्रेसने सुशीलकुमार शिंदे यांना देण्याच ठरवल पण पूर्व संसदीय सदस्य ताराप्पा सोनवणे यांना तिकीट दिल गेल.शरद पवारांनी तेव्हा सुशील कुमार शिंदेंना धीर ठेवण्यास सांगितले.ताराप्पा सोनवणे निवडून आले व आमदार झाले,परंतु दुर्दैवाने वर्षभरातच त्यांचा मृत्यू झाला.1973साली या मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली व काँग्रेसचे तिकीट सुशीलकुमार शिंदे यांना मिळाल.
23 एप्रिल 1973ला ही निवडणूक पार पडली आणि सुशील कुमार शिंदे 25000 मतांनी विजयी झाले.यानंतर सुशीलकुमार शिंदे यांचा राजकीय आलेख चढता राहिला ते मुख्यमंत्री झाले,अर्थमंत्री झाले. मा. शरद पवारांच दिलदार व्यक्तिमत्व नेहमीच दुसरे नेते घडवण्यातून प्रतित होते.सामान्य कार्यकर्त्यातील नेतृत्व गुण हेरून त्याला संधी देण्यात पवार साहेब नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. संधी देताना जात, धर्म याच्यापलिकडे जाऊन नेहमीच राज्याच्या जनतेचे हित पवार साहेब लक्षात घेतात.पवार साहेबांचा एक प्रश्न सुशीलकुमार शिंदे यांना राजकीय वाटचालीत येण्यास व यशस्वी होण्यास कारणीभूत ठरला.पवार साहेबांनी स्वतःहून मुख्यमंत्रीपद नाकारल यातूनही त्यांची दूरदृष्टी दिसून येते.माझा प्रत्येक कार्यकर्ता नेता असावा अशी त्यांची इच्छा आहे.