मा.शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी गुजरातमध्ये भेट

0

गुजरात : सध्या राज्याच राजकारण तापल असून मुकेश अंबानी अँटिलीया स्फोटक प्रकरण, सचिन वाझे, मनसुख हिरण प्रकरण यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाल आहे.अशातच शिवसेनेचे सगळे नेते अडचणीत आले आहेत आणि भरीस भर म्हणजे संजय राऊतांनी सामानातून गृहमंत्री अनिल देशमुखांवर टिका केली आहे.

या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मध्यरात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि नेते प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची अहमदाबाद येथील शांतिग्राम गेस्ट हाऊसवर भेट घेतल्याची बातमी दिव्य भास्करच्या गुजराती आवृत्तीत सूत्रांच्या हवाल्याने छापून आली आहे.देशातील दोन दिग्गजांच्या या भेटीन महाराष्ट्रात चर्चेला उधाण आले आहे.

भाजपने शिवसेनेला बाजूला करत राष्ट्रवादीशी सलगी करण्याचा प्रयत्न यापूर्वीही केला असून सत्ता स्थापनेचा त्यांचा डाव त्यांच्या अंगलट आल्याचे उदाहरण महाराष्ट्राने पाहिले आहे.सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस असे सत्तेत समीकरण असून सरकार स्थिर आहे.

मा. शरद पवारांची ही भेट राजकीय चर्चेसाठी होती की, इतर कारणासाठी याबाबत स्पष्टीकरण नसून ही भेट गुप्त स्वरुपात राहावी तसेच याची बातमी बाहेर फुटू नये याची काळजी घेण्यात आली होती.यासाठीच ही बैठक अहमदाबाद येथील शांतिग्राम गेस्ट हाऊस येथे पार पडलेल्या पडल्याच बोलल जात आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.