
नाकावरील ब्लॅकहेड्स कमी करण्याचे घरगुती उपाय
तरुणाईची प्रमुख सौंदर्य समस्या म्हणजे ब्लॅकहेडस होय. हे ब्लॅकहेडस प्रामुख्यानं नाक, छाती आणि पाठ येथे उठतात. ब्लॅकहेडस म्हणजे त्वचेवर येणारी छोटी छोटी छिद्र होय. ही छिद्र आपल्या त्वचेवर असणारी हेअर फाॅलीकल्स बंद झाल्यामुळे दिसतात. चेहर्यावरील हार्मोन्सच्या बदलामुळे आणि नाकाजवळील तेल ग्रंथीमुळ ब्लॅकहेडस वाढतात. ब्लॅकहेडस कमी करण्यासाठी पार्लरमध्ये जाव लागत परंतु घरगुती उपायन ब्लॅकहेडस कमी होतात ते पुढीलप्रमाणे.
१) ब्लॅकहेडस वाढू नये म्हणून स्क्रू करता येतो त्यासाठी चमचाभर मधात थोडीशी साखर घालून हे मिश्रण नाकावर चोखा.
२) नियमित मेक अपने ब्लॅकहेडस वाढतात, झोपण्यापूर्वी मेक अप काढा अन्यथा रोमछीद्र बंद होऊन ब्लॅकहेडस वाढतात.
३) नियमित व्यायाम केल्यास ब्लॅकहेडस निघून जातात.
४) काकडीचा रस लावल्यास त्वचेवरील रोमछीद्र मोकळी होऊन ब्लॅकहेडस दूर होतात.
५) कोरफड गर चेहर्यावर लावून कोमट पाण्याने चेहरा धुवा ब्लॅकहेडस जाण्यास मदत होते.
६) बेकींग सोडा लावा ते एक नैसर्गिक एक्सफोलेटर आहे, बेकींग सोडा आणि पाणी यांची पेस्ट तयार करून ब्लॅकहेडस असलेल्या भागावर लावा व त्वचेवर स्क्रब करा आठवड्यातून दोनदा हा उपाय करा.
त्वचेवरील ब्लॅकहेडस कमी करण्याचे हे घरगुती उपाय निश्चित करून बघा, उपाय आवडल्यास आमचे फेसबुक पेज लाईक करा.