गृहराज्यमंत्र्यांना पोलिसांची काळजी, स्वतः आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेण्याच केलं आव्हान !

0

महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी राज्यात कडक जिल्हा बंदी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात कडक जिल्हा बंदीची अंबलबजावणी करा असे आदेश गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत.

देसाई यांनी शिंदे चेक नाक्यावर भेट देऊन भेट देऊन पाहणी केली. या वेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, फलटणचे उपअधीक्षक तानाजी बरडे व शिरवळचे पोलिस निरीक्षक उमेश हजारे उपस्थित होते. राज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले,”संपूर्ण राज्यात जिल्हा वाहतुकीची बंदी लागू करण्यात आल्याने वैद्यकीय किंवा अत्यावश्‍यक कारणाशिवाय जिल्ह्याची हद्द सोडता येणार नाही. फारच गरज असेल तर परवानगी घेऊन प्रवास करावा.

तसेच ते पुढे म्हणाले की जनतेने स्वतः ची काळजी घेतली पाहिजे सोबतच पोलिसांची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. पोलिस म्हणजे आपल्या समाजाचा एक भाग आहे. त्यामुळं देसाई यांनी सर्व जनतेला आवाहन केलं आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.