छंदाचा केला व्यवसाय, मिठाई विकून मिळतात 48 लाख रुपये

0

ही एका जिद्दी महिलेची कथा असून कोलकत्याच्या या महिलेचे नाव आहे मंजू देवी पोद्दार.कोलकत्यात त्यांना मंजू नानी म्हणूनच ओळखला जात.65 वर्षीय मंजू अतिशय चविष्ट मिठाई बनवतात.मंजू यांना स्वयंपाक करण्याची आवड असून मिठाई ही त्यांची खासियत आहे.मंजू यांनी बनवलेल्या मिठाया अमेरिका आणि हाँगकाँगला जातात.मंजू म्हणतात,स्वयंपाक करणे त्यांना आवडते. त्यामुळे मी जे जेवण बनवते ते चविष्ट होते. मी अतिशय आनंदाने व रमून स्वयंपाक करते.स्वयंपाक करणे हे काम नसून मी त्याला एक कला समजते.मंजूंनी सांगितले त्यांना त्यांच्या सासूबाईंनी स्वयंपाक करणे शिकवले.

मंजू यांच्या बालपणात डोकवले असता असे लक्षात येते की, त्यांना अभ्यास आवडत नव्हता, परिणामी त्यांच फारस शिक्षण होऊ शकत नाही.स्वयंपाक बनवण्या त्यांना रस होता,परंतु अगदी सोपे पदार्थ शिकायलाही त्यांना 2ते3 वर्ष लागली.परिणामी स्वयंपाक घरात त्या रमू शकत नव्हत्या.वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी त्यांचे लग्न झाले ,अडखळत दोन तीन पदार्थ करणार्या मंजूना त्यांच्या सासूबाईंनी स्वयंपाक शिकवून पारंगत केले.कालांतराने त्यांनी स्वयंपाकात नवनवीन प्रयोग केले व तो त्यांचा आवडीचा छंद झाला.वेगवेगळ्या पदार्थांबरोबर मिठाया करण्याचाही त्यांना छंद लागला.

मंजू ज्या मिठाया बनवतात त्यात मावा परवा, नारळाची चिक्की, मावा पेढा या मोठ्यांचा समावेश असून यांची रेसिपी त्या सर्वांना शेअर करतात.या मिठाया विकून त्या दरमहा 4 लाख रुपये म्हणजेच वर्षाला 48 लाख रुपये मिळवतात.मंजूच्या 21 वर्षाच्या नातवाने त्यांच्यावर नानीज स्पेशल वेंचर सुरू करण्याचा हट्ट धरला यातून त्या घरी शिजवलेली अन्न देतात.मंजूची नातवंड,सुन,मुलगी यांनी लोगो डिझाईन करून तो वॉटर अपवर आपल्या मित्रमंडळीत शेअर केला व आॅर्डर सुरू झाल्या.त्यांची पहिली कमाई 3000 रुपये होती.मंजू म्हणतात पहिल्या कमाईचे 3000 रुपये मी जपून ठेवले असून ते कधीही खर्च करणार नाही.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.