हे राम! राम मंदिराच्या भूखंडाचे श्रीखंड, अवघ्या दहा मिनिटांत २ कोटींचा भूखंड १८ कोटींना खरेदी; देशभर खळबळ!

0

आयोध्या येथील राम मंदिराच्या बांधकामाची जोरदार तयारी सुरू आहे. या कामाच्या निर्मितीसाठी गावागावात जाऊन निधी मागण्यात येत आहे. मंदिर निर्मितीचे कार्य ही सन्मानाची, अभिमानाची गोष्ट म्हणून बहुतांश लोकांनी जबाबदारी घेत सहभाग नोंदवला आहे, ते वेळ आणि पैसा दोन्ही देत आहे.

अशाच मध्ये अयोध्येतील राम मंदिराच्या भूखंडाच्या खरेदीचा मोठा गैरव्यवहार समोर आला आहे. देशभरामध्ये या गोष्टीवरून चांगलीच खळबळ उडाली आहे. राम मंदिर ट्रस्टने अवघ्या दहा मिनिटातच 2 कोटींचा भूखंड 18 कोटीला खरेदी केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा आरोप आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंह यांनी कागदपत्रांच्या हवाल्याने केला आहे. त्यांनी ही माहिती ट्विट करून दिली आहे.

या आरोपामुळे देशभरातून ट्रस्टच्या विश्वासहार्यतेवर प्रश्नचिन्हं उपस्थित केली जात आहेत. पुढील वर्षी उत्तर प्रदेशातील निवडणुका आहेत त्या हेतूने भाजपने मोर्चेबांधणी सुरू केलेली असतानाच श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचा हा घोटाळा उघड झाल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.

जो भूखंड 2 कोटींचा आहे त्याच भूखंडांची किंमत अवघ्या दहा मिनिटात 18 कोटीं किंमत ट्रस्टने कशी केली, या बद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच याच्या मागील कारण काय? याची माहिती अगोदर का दिली गेली नाही, या व्यवहाराला मंजुरी कशी मिळाली अशा प्रकारचे प्रश्न देशभरातून केले जात आहेत. मात्र ट्रस्ट ने हे आरोप फेटाळून लावले आहेत. मात्र आता पुढे काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.