
चेहरा उजळण्यासाठी करा हे सोपे घरगुती उपाय
उजळ, नितळ चेहरा तुमचे सौंदर्य वाढवतो. उन्हाळ्यात चेहरा काळवंडतो किंवा थंडीत फुटतो या सर्वांवर उपाय म्हणजे चेहऱ्याची निगा राखावी लागते. उन्हाळ्यात चेहरा उजळावा यासाठी घरातून बाहेर पडताना तोंडाला स्कार्फ बांधा, सनस्क्रीन लावा. चेहऱ्याची नियमित काळजी घ्या. आज आपण इथे चेहरा उजळण्यासाठी काही घरगुती टीप्स पाहणार आहोत.
१) २ चमचे साखर घ्या त्यात लिंबाचा रस घाला, व या लेपाने चेहरा, मान, हातावर मसाज करा. साखरेचे दाणे विरघळेपर्यंत हा मसाज करा यांमुळे रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुरळीत होऊन घाण स्वच्छ होते, चेहर्यावरील काळपटपणा दूर होतो.
२) पिकलेले केळ कुस्करून चेहर्यावर लावा व २० मिनिटे ठेवून चेहरा धुवा. आठवड्यातून दोनदा हा उपाय करा.
३) संत्र्याची साल सुकवून मिक्सरमध्ये वाटा, दुधात मिसळून पेस्ट तयार ही पेस्ट चेहर्यावर लावा त्वचा उकळते.
४) शहाळ्याचे पाणी लावल्यास चेहर्यावरचे डाग आणि सुरकुत्या दूर होतात.
५) ७ ते ८ बदाम दुधात भिजवून चेहर्यावर लावा थंड पाण्याने धुवा.
६) चेहर्याला सनस्क्रीन लावा, स्कार्फ वापरा.
७) चंदन पावडर, हळद, बदामाचे तेल मिक्स करून पॅक तयार करा व चेहर्यावर लावा.
वरील उपाय आठवडाभराच्या बदलाने तसेच ऋतुमानानुसार करा. चेहर्याची त्वचा नाजूक असून त्यावर उपाय करताना काळजी घ्या तसेच गंभीर समस्या असल्यास तज्ञांचा सल्ला घ्या.