
मूळव्याध हा एक उष्णतेचा विकार असून अनेकजण याने त्रस्त असतात. अवघड जागेच दुखण असे मूळव्याधीला संबोधल जात. मूळव्याध असल्यास आहार तसेच पथ्यपाणी निश्चितच पाळावे. मूळव्याधीत कोंब येणे, रक्त जाणे इत्यादी प्रकार होतात याला जुनाट मूळव्याध म्हणतात. परंतु मूळव्याधीची सुरुवात असेल तर योग्य औषधोपचार आणि पथ्य यामुळे ती आटोक्यात येऊन बरी होते. मूळव्याधीवर एक घरगुती रामबाण उपाय पाहूया चला,
साहित्य :
लिंबू – १
सैंधव मीठ – ४ चमचे
कृती :
लिंबू धुवून अर्धा चिरावा व बिया काढून घ्या, आता त्यावर चिमूटभर सैंधव मीठ पसरा व लिंबूचा रस तोंडाना चोखा मीठ संपताच परत चिमूटभर मीठ पसरा व रस चोखा असे अर्धा लिंबू रोज सकाळी अनुषापोटी खायचा आहे. उरलेला अर्धा लिंबू याप्रकारेच संध्याकाळी चहा पिल्यानंतर चोखून रस प्यायचा आहे. दिवसभरात एक लिंबू संपवा. मूळव्याधीची सुरुवात असल्यास तीन दिवसात आराम पडतो. एरवी ७ दिवसात फरक जाणवतो व जुनाट मूळव्याध असल्यास २१ दिवस उपाय करा निश्चितच आराम मिळून मूळव्याध बरी होते.
मित्रांनो वरील उपाय पूर्णपणे निर्विष आहे. नैसर्गिक तसेच शाकाहारी सिध्द आहे तरीही डाॅक्टरांचा सल्ला वारंवार घेत जा.