खा. सुजय विखे यांनी आणलेले इंजेक्शन आम्हाला मिळत नाही मग गेले कुठे – नगरवासीयांचा सवाल.

0

 खा. सुजय विखे यांनी आणलेले इंजेक्शन आम्हाला मिळत नाही मग गेले कुठे – नगरवासीयांचा सवाल.

काही दिवसांपूर्वी सुजय विखे यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. सुजय विखे यांच्या कार्यकर्त्यांनी व्हिडिओ नंतर असा दावा केला आहे की सुजय विखे यांनी तब्बल १० हजार इंजेक्शन आणले आहेत. त्या व्हिडिओ वरून चांगलेच राजकारण तापले आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत सुजय विखे यांना ट्विटर वरून सवाल केला आहे.


अहमदनगर वासीय प्रश्न विचारत आहेत इंजेक्शन नेमकं गेलं कुठं…
त्या म्हणाल्या “खासदार सुजय विखेंचा व्हिडीओ आणि त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून १० हजार इंजेक्शन आणल्याचा केला गेलेला दावा हे संपूर्णपणे संशयास्पद आहे. एकीकडे नगर जिल्ह्यातील नागरिक इंजेक्शनसाठी मदतीची याचना करत असताना असे व्हिडीओ ही नागरिकांची चेष्टा आहे. एकतर सुजय विखेंनी त्या बॉक्स मध्ये काय होते हे स्पष्ट करावे आणि जर रेमडिसिव्हीर असतील तर ते कुणाला वाटले अथवा सामान्य जनतेला ते कुठे मिळतील याची माहिती द्यावी”. असे ट्विट करत त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.