भाजलेल्या लसणाच्या पाकळ्या खाण्याचे आरोग्यदायी फायदे

0

भारतीय जेवणात लसूण अगत्याने खाल्ला जातो. लसणाची फोडणी देऊन केलेला पदार्थाची रुची वाढवतो. लसणाची चटणी, लोणच असे पदार्थ बनवले जातात. लसूण उग्रवासी असला तरी चव आणि आरोग्यदायी फायदे यामुळे लसूण खाल्ला जातो. फोडणीला लसूण नेहमीच खाल्ला जातो परंतु आज आपण भाजलेला लसूण खाण्याचे काही फायदे पाहणार आहोत.

१) सकाळी भाजलेल्या लसणाच्या २ ते ३ पाकळ्या खाल्ल्याने हाडे बळकट होण्यास मदत होते.
२) रात्री झोपण्यापूर्वी भाजलेल्या लसणाच्या २ ते ३ लसणाच्या पाकळ्या खाल्ल्याने शरीरातील घातक, विषारी द्रव्ये लघवीवाटे बाहेर टाकली जातात.
३) शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
४) लसणामध्ये सेलेनियम हा घटक असल्याने पुरुषांनी रात्री झोपण्यापूर्वी भाजलेल्या लसणाच्या काही पाकळ्या खाल्ल्याने स्पर्म क्वालिटी सुधारते.
५) घसा खवखवत असल्यास किंवा खोकला झाल्यास भाजलेला लसूण सेवन करावा.

भाजलेला लसूण अति खाऊ नये. लसूण तिखट, उष्ण आहे. परिणामी लसूण प्रमाणातच खावा.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.