मधुर अंजीर खाण्याचे आरोग्यदायी फायदे

0

अंजीर महाराष्ट्रातील प्रमुख पिकांपैकी एक आहे. अंजीर ताजी पिकलेली तसेच सुकवून खाल्ली जातात. ताजी अंजीर लस्सी, बर्फी तर तशीच खाल्ली जातात. तर सुकलेली अंजीर गोड पदार्थात वापरली जातात. अजींरात व्हिटामिन ए , सी, कॅल्शियम, फॉस्फरस, बीटा कॅरोटीन असे आरोग्यदायी घटक आढळतात. अंजीराचे आरोग्यदायी फायदे पुढीलप्रमाणे


१) अंजीर प्रकृतीने थंड असल्याने पित्तशामक आहे.
२) अंजिराने उष्णतेचे विकार नाहिसे होतात. पचनशक्ती सुधारते.
३) अंजीरामुळे शरीरातील साखरेचे व ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रणात राहते. शरीरात इन्सुलिन निर्माण होते. परिणामी डायबेटीजमध्ये अंजीर उपयुक्त आहे.
४) अंजीरात मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम असते. कॅल्शिअममुळे व्हिटामिन डी ची आवश्यकता पूर्ण होते.
५) अंजीरात मोठ्या प्रमाणात सोल्यूबल फायबर्स आढळतात परिणामी शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.
६) अंजीर तंतुमय फळ असल्याने यात भरपूर प्रमाणात फायबर्स आढळतात. परिणामी अंजीर बध्दकोष्ठतेपासून मुक्ती देते.
७) कपभर दुधात रात्री झोपण्यापूर्वी अंजीर नियमितपणे सेवन केल्यास पौरुषत्व वाढते.

वरील अंजीराचे फायदे पाहता, ज्यावेळी उपलब्ध होतील तेव्हा ताजी अंजीर तर एरवी सुकवलेली अंजीर सेवन करावी व आरोग्यदायी फायदे करून घ्यावे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.