त्याने “किस” करण्यास नकार दिला,आणि “तिने” गोळी झाडून त्याला संपवलं…! जगाला हेलावून सोडणारी घटना

0

खरंतर आजपर्यंत आम्ही खूप हत्येच्या घटना ऐकल्या असतील, पण एका चुंबनासाठी कुणाची हत्या करणं हे पहिल्यांदा च ऐकायला मिळत आहे.ही घटना अमेरिका मधील इलिनॉय शहरात घडली असून एका २८ वर्षांच्या महिलेने हा थरारक कृत्य केलं आहे.

रात्री या महिलेच्या सोबत असलेल्या जोडप्याने मद्यपान केलं आणि या महिलेने तिच्या मित्राला जेम्स ला किस कर म्हणून सांगितलं जेम्स ने तिला नकार दिला,आणि नकार मिळताच ह्या महिलेला राग आला आणि तिने बंदूक काढून त्या व्यक्तीच्या छातीवर गोळ्या झाडून त्याला ठार केले.

शिकागो सन टाईम्स ने दिलेल्या वृत्तानुसार क्लाडिया फ्लोरेस एका जोडप्यासह एका अपार्टमेंट मध्ये विश्रांती घेत मद्यपान करत होते.आरोपी महिला रेझिनडिया फ्लोरेस आणि ते जोडपं मद्यपान करत असताना त्या महिलेने २९वर्षीय जेम्स ला चुंबनासाठी विचारलं असता त्याने स्पष्ट नकार दिला.

यानंतर जेम्स त्याच्या प्रेयसी कडे वळाला आणि तिला तो किस करू लागला,त्यामुळे त्या महिलेचा पारा जास्तच वाढला.तिने पुन्हा एकवेळ जेम्स ला किस साठी विचारलं तरीसुद्धा जेम्स ने तिला नकारच दिला,तेंव्हा ती महिला खूप आक्रमक झाली आणि रागाच्या भरात तिने तिची बंदूक काढली आणि दोन पलंगाच्या कुशन्स मध्ये ठेवून तिने जेम्स ला लक्ष्य केले,असे तिच्या वकिलांनी सांगितले.

जेम्स ने त्या महिलेचा खांदा खाली ढकलण्याचा प्रयत्न केला पण तिने स्वतःला बचावण्यासाठी प्रयत्न केला असता ट्रिगर वर बोट ठेवलं आणि बंदुकीतून गोळी निघून गेली,ती थेट जेम्स च्या छातीवर जाऊन धडकली आणि जेम्स जागेवरच कोसळला,जेम्स ची प्रेयसी खूप घाबरली आणि तिने ९९१ या नंबर वर कॉल करून या घटनेची माहिती दिली,

आणि तिथं संबंधित अधिकारी उपस्थित झाले.त्यावेळी त्या महिलने आपण जेम्स वर गोळी चालवली याची कबुली दिली,तिच्या वर फर्स्ट डिग्री हत्येचा आरोप आहे,आणि आता ह्या प्रकरणाची पुढील कारवाई आता कोर्टात होणार असून रेसेदिन्स फ्लोरेस ला गुरुवारी हजेरी लावण्याचे आदेश दिले आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.