
त्यांनी महाराष्ट्र द्रोही असल्याचे सिद्ध केलं….
बेळगाव येथील लोकसभा पोट निवडणुकीचे आज मतदान संपन्न होत आहे. महाराष्ट्र आणि बेळगाव च्या दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. त्या साठी महाराष्ट्रातून दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. वेळोवेळी प्रचार सभा सुद्धा घेतल्या आहेत.
आज मतदान केल्याच्या नंतर महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना सांगितले की ” आमचे अंतिम ध्येय हे महाराष्ट्रात सामील होणे हेच आहे इथे मराठी माणसाची गळचेपी होत आहे”. बेळगाव मधील लढा हा मराठी माणूस विरूद्ध कर्नाटक असा आहे. तसेच बोलत असताना पुढे शुभम शेळके म्हणाले की ” जे महाराष्ट्रातून आमच्या विरूद्ध प्रचाराला आले त्यांनी स्वतः महाराष्ट्रद्रोही असल्याचे सिद्ध केलं आहे”. असे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर कठोर शब्दात टीका केली आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, शिवसेना नेते संजय राऊत यांनी हजेरी लावली. ही निवडणूक ही बेळगाव सोबतच महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. महाराष्ट्रातील जनतेची बेळगाव बाबतीत कायमच आग्रही भूमिका राहिलेली आहे. त्यामुळं सर्वांचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.