
वयाची पर्वा न करता तो करतोय रुग्णांना मदत!
मी काय अजून म्हातारा झालो आहे का! असे काहीं लोकांचं काम पाहिलं की वाटतं. वय हे फक्त निमित्त आहे; काम पाहून त्यांचं खुलून आलेलं तारुण्य सर्वांच्या लक्षात येतं. होय अशाच व्यक्ती बद्दल आपण समजून घेणार आहोत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूरच्या मेडिसीन विभाग प्रमुख डॉ. प्रशांत पाटील हे ६० व्या वर्षीही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोविड वार्डमध्ये रुग्णांची सेवा करीत आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेत ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दखल घेत ट्विटर वरती कौतुक केलं आहे.
चांगल्या कामाचं कौतुक होताना दिसत आहे. खऱ्या अर्थाने जनतेच्या साठी अहोरात्र कष्ट घेणाऱ्या या डॉक्टरला मनापासून लोक thank you म्हणताना दिसत आहे.
शास.वैद्यकीय महाविद्यालय,नागपूरच्या मेडिसीन विभाग प्रमुख डॉ. प्रशांत पाटील हे ६० व्या वर्षीही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोविड वार्डमध्ये रुग्णांची सेवा करीत आहेत. त्यांच्या निर्भयतेला,सेवाभावाला माझा,सरकार व जनतेचा मनापासून सलाम!@InfoNagpur @CMOMaharashtra@AmitV_Deshmukh pic.twitter.com/kOMj3kyiFI
— Dr. Nitin Raut (@NitinRaut_INC) April 22, 2021