
केरळमधील अतिशय भावूक करणारी प्रेम कहाणी आहे. पल्लकड जिल्ह्यातील अयादूर गावात साजिथा आणि रेहमान राहत होते दोघांच्यात प्रेम निर्माण झाल. परंतु घरच्यांना अंतरधर्मीय विवाह मान्य नव्हता. परिणामी दोघांनीही पलायन केल आणि रेहमानच घर गाठल. प्रेमासाठी काही वाट्टेल त्या या उक्तीनुसार रेहमानन आपल्या प्रेयसीसाठी आपल्या घरातच तिच्यासाठी एक विश्व निर्माण केल.
रेहमानने साजिथाला आपल्या घरातच स्वताच्या खोलीत ठेवल. रेहमान इलेक्ट्रशीयन असून त्यान खोलीला कुलूप बसवल तसच टिव्ही ठेवला आणि साजिथाला हेडफोन दिले. साजिथा एका खोलीतन बाहेरच पडली नाही. रेहमान स्वताच्या खोलीत जाऊन जेवायचा. फक्त आधीपेक्षा दुप्पट जेवायला त्याने सुरुवात केली. साजिथा या दहा वर्षात एकदाही आजारी पडली नाही. तिला ताप आला तर रेहमान तिला पॅरासिटामलच्या गोळ्या देत होता. दहा वर्ष त्यांच हे प्रेमप्रकरण एकाच घरात चालू होत आणि ते साजिथा किंवा रेहमान दोघांच्याही घरातल्यांना कळल नाही. साजिथाच घर रेहमानच्या घरापासून ५०० मीटर अंतरावर होत. तरीही साजिथाच्या माहेरी हे कळल नाही.
दरम्यान रेहमानने गावातच दुसर घर घेतल, आणि दोघेही त्या घरात लपून छपून राहू लागले. परंतु रेहमानच्या वडिलांनी पोलीसात रेहमान गायब झाल्याची तक्रार दिली . यानंतर रेहमान त्याच्या भावाला दिसला व दोघांना पोलिसांनी पकडल आणि दोघांनीही आपल्या प्रेमाची कबूली दिली. दोघांनाही घरच्यांनी मान्य केल आणि रितसर लग्न लावून दिल.