CCTV पाहिले का? त्या १२ आमदारांना कसे शोधून काढले? भास्करराव जाधव यांनी दिलं उत्तर!

0

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भारतीय जनता पक्षाच्या आमदारांचे निलंबन करण्यात आले या निलंबनामुळे तालिका अध्यक्ष असलेले भास्कर जाधव चांगलेच चर्चेत आले आहेत. त्याच १२ आमदारांवर का कारवाई करण्यात आली यासंदर्भातील त्यांना प्रश्न लोकसत्ता डॉट कॉम ने घेतलेल्या मुलाखती मध्ये विचारण्यात आला. या प्रश्नावरही भास्कर जाधव यांनी उत्तर दिलं आहे.

उत्तर देताना संसदीय कार्यमंत्र्यांनी ही नावं शोधून काढल्याचं भास्करराव जाधव यांनी सांगितले. तसेच ते पुढे म्हणाले की “हा निर्णय सरकार जाहीर करतं. संसदीय कार्यमंत्री यासंदर्भातील अहवाल तयार करतात. तो अहवाल सभागृहामध्ये सादर केला जातो. अध्यक्षांनी सभा अध्यक्ष म्हणून त्याला मान्यता द्यायची असते. त्यामुळे स्वाभाविक आहे संसदीय कार्यमंत्र्यांनी ही बारा नावं शोधून काढली,” असं त्यांनी सांगितले.

पुढे बोलत असताना ते म्हणाले की शोधणे इतकं काही अवघड नव्हते. तसेच “ज्यावेळी सभागृहामध्ये ज्या पद्धतीने माझ्यासमोरचा माईक खेचण्यात आला, ज्या पद्धतीने राजदंड उचलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला, ज्या पद्धतीने तिथं आक्रस्थाळेपणा करण्यात आला होता ते सर्व सभागृह बघत होतं. काही आमदार अध्यक्षांच्या केबिनमध्ये आले होते. तेव्हा शिपायांनी त्यांना पाहिलं, चोपदार, भालदारांनीही कोणते आमदार आले हे पाहिलं. बाकी आमदार पण हे बघत होते. त्यातूनच त्यांनी ही नावं शोधून काढली असावीत. त्यात अवघड काहीच नव्हतं,” असं जाधव यांनी मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.