महाराष्ट्राला दिड कोटी लस देणार असल्याने केंद्राची पूनावालांना तंबी, म्हणून ते लंडनला गेले : हसन मुश्रीफ

0

देशात लसीकरणाच्या मुद्द्यावरून अजूनही चांगलीच केंद्र सरकारची पिसे काढली जात आहेत. आपल्या देशाला लसीकरणाच्या बाबतीत प्राधान्य द्यायचे सोडून केंद्र सरकारने परदेशात लसी पाठवल्या. देशातील परिस्थितीत कोरोनाच्या बाबतीत बिघडली. लसीकरणमोहीम ही राज्य आणि केंद्र सरकार यांच्या मध्येच अडकून पडली आहे. समन्वयातून मार्ग काढता आला असता मात्र केंद्र सरकारने अशी भूमिका घेतली नाही.

केंद्र सरकारच्या आडमुठे भूमिकेवर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ चांगलेच आक्रमक झाले आहेत.ते म्हणाले की “सीरम कंपनीचे प्रमुख आदर पुनावाला राज्य सरकारला दीड कोटी कोरोना लसीचे डोस देणार होते. मात्र, त्याआधीच केंद्र सरकारने त्यांना तंबी दिली आणि त्यामुळे ते लंडनला जाऊन बसले,” असा आरोप राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

मुश्रीफ म्हणाले, “महाविकास आघाडी सरकारने ग्लोबल टेंडर काढण्याची घोषणा करत १८-४४ वयोगटातील लसीकरणाची घोषणा केली होती. मात्र काही कंपन्या केंद्र सरकारसोबत बोलू; तुमच्या सोबत नाही. मात्र सीरम कंपनीचे प्रमुख अदर पुनावाला यांनी जूनपासून दीड कोटी कोरोना लसी देण्याचं ठरवलं होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना केंद्र सरकारने तंबी दिली आणि ते लंडनला जाऊन बसले. आपल्या राज्यात तयार होणारी लस आपल्याला मिळत नाही. लस उत्पादकांना धमक्या द्यायच्या ही पद्धत बरोबर नाही.” असे हसन मुश्रीफ म्हणाले

Leave A Reply

Your email address will not be published.