
कोल्हापूरकरांच्या पाणी प्रश्नांवर निघाला तोडगा, हसन मुश्रीफ यांची मोठी घोषणा!
महाराष्ट्रातील दुसरी कोरोनाची लाट ओसरत असल्याची दिसत आहे. त्यामुळे राज्यातील विकास कामांना गती मिळाली आहे. आता राज्यात स्थगित असलेल्या कामांना आता वेग यायला लागला आहे. तसेच पुढील काही दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी नगरपालिका, नगर परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. अशाच मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि ग्रामीण विकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर येथील पाण्याच्या संदर्भात मोठी घोषणा केली आहे.
हसन मुश्रीफ यांनी सूचक विधान करत काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईन द्वारे कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा केला जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच ते पुढे म्हणाले की पुढील वर्षी मे महिन्यांपर्यंत ‘थेट पाईपलाईन योजना’ पूर्णत्वास नेणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
कोरोनामुळे राज्यातील बहुतांश विकासकामे हे अर्धवट राहिली आहेत, तर काही विकास कामांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे ही योजना सुद्धा लांबणीवर पडली होती. मात्र आता ही योजना लोकांचे हित लक्षात घेत राबवली जात आहे.