हसन मुश्रीफ ठोकणार किरीट सोमय्यांवर १०० कोटींचा अब्रुनुकसानी आणि फौजदारी दावा

0

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी कोट्यवधी रुपयांच्या मनी लाँड्रिंगचे आरोप केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.’किरीट सोमय्या यांनी चंद्रकांत पाटील यांच्या सांगण्यावरून आरोप केले असून, सर्व बिनबुडाचे आहे. बदनामी करण्याचा प्रयत्न असून, आपण किरीट सोमय्या यांच्याविरुद्ध १०० कोटींचा अब्रुनुकसान आणि फौजदारीचा दावा ठोकणार असल्याचं मुश्रीफ म्हणाले.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर मनी लाँड्रिंग व बेनामी व्यवहार केल्याचा आरोप केला. सोमय्या यांच्या आरोपानंतर हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोपांना उत्तर दिलं.’आम्ही आवाहन केल्यानंतर १७ कोटी रुपये जमले होते. चार बँकांचे मशीन घेऊन चार दिवस नोटा मोजत होतो. लोकांनी अगदी पाच पाच रुपये कारखान्यासाठी दिले. भागभांडवल गोळा करून राष्ट्रीयकृत बँकेच्या मदतीने हा कारखाना उभा केला’, असंही मुश्रीफ म्हणाले.’किरीट सोमय्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. सोमय्यांना सांगू इच्छितो की ज्या कारखान्याबद्दल ते बोलत आहेत, त्यात हजारो शेतकऱ्यांनी पैसे गुंतवलेले आहेत.

‘किरीट सोमय्यांनी माझ्या पक्षाविरुद्ध, पवारसाहेबांविरुद्ध बिनबुडाचे आरोप केले आहेत. सोमय्यांनी माझ्यावर १२७ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. सोमय्यांच्या CA पदवीबद्दल शंका आहे. कारण त्यांनी जी कागदपत्रं दाखवली आहेत ती IOC च्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. जर ती खोटी असती, तर त्यावेळीच समोर आलं असतं. आम्ही निवडणूक आयोगालाही कागदपत्रं दिलेली आहेत’, असं मुश्रीफ म्हणाले.माझ्यावर इन्कम टॅक्सने धाड टाकली त्यात काहीच मिळालं नाही. अडीच वर्ष झाली धाड टाकून, त्यावर काही कारवाई नाही. आता किरीट सोमय्या उठून आरोप करत आहेत.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.