“नागपुरात लाज वेशीला टांगत स्टेजवर अर्धनग्न डान्सचा हंगामा..!”

0

बिभित्सपणाचा कळस गाठणारा प्रकार नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात अलीकडेच काही दिवसापासून बघायला मिळत आहे. रात्र होताच बंद शामियान्यात शेकडो तरुणाईच्या उपस्थितीत ‘ न्यूड (नग्न) डान्स ‘ असा किळसवाणा प्रकार सुरु असतो.

उमरेड आणि कुही तालुक्यातील काही गावांमध्ये ‘डान्स हंगामा’ अशी जाहिरातबाजीची पत्रके सगळीकडे लावण्यात आली आहेत. या पोस्टर मध्ये सिम्पल हंगामा, हॉट हंगामा, नो एन्ट्री हंगामा अश्या सूचनांसह पोस्टर लावण्यात आली आहेत.

कुही तालुक्यातील मुसळगाव, भूगाव आणि सिल्ली तर उमरेड तालुक्यातील बाम्हणी या ठिकाणी या डान्स शोचे आयोजन नुकतेच पार पडले. पहिल्या तीन गावांमध्ये या डान्स शोने काही प्रमाणात मर्यादा ओलांडल्या. बाम्हणी या ठिकाणी तर हद्दच पार केली या शोने. बाम्हणीमध्ये न्यूड डान्स शोने चांगलाच हंगामा केला.

या ठिकाणी सायंकाळी ७ वाजता नाचगाण्याचा कार्यक्रम सुरु झाला. हळूहळू गर्दी वाढायला लागली. पाचशेहुन अधिक तरुण बंद शामियान्यात गोळा झाले. हिंदी गाण्याच्या तालावर तरुण थिरकायला लागले. क्षणभरातच मंचावर अक्षरशः विवस्त्र होत नाचायला सुरवात केली.

शेकडो तरुणांच्या गर्दीत बंद शामियान्यात हा प्रकार मागील काही दिवसापासून खेड्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केले जात आहे. केवळ शंभर रुपयांमध्ये हा डान्स हंगामा बघण्यासाठी तरुणांची गर्दी उसळत आहे. अनेकांनी न्यूड डान्सचे व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट केले आहेत.

अंगावर केवळ अंतर्वस्त्र परिधान केलेल्या दोन तरुणी आणि त्यांच्या सोबतीला अर्धनग्न कपडे घातलेले दोन तरुण मंचावर डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच काही गावांमध्ये कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.