गुजरात व्यापारी, पण महाराष्ट्र लढवय्या, दिल्लीच्या आडमुठेपणामुळे कोरोना लसीकरण थांबले – शिवसेनेचा घणाघात

0

महाराष्ट्राला लढवय्ये राज्य म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र राज्य हे वेळोवेळी खंबीर भूमिका घेत आले आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटांशी सामना करण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे.महाराष्ट्र राज्याने दिल्लीची फालतू गुलामगिरी कधीही सहन केलेली नाही. दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र झुकत नाही असे मागेही खा. शरद पवार म्हणाले होते.

आज शिवसेनेच्या मुखपत्रातून म्हणजे “सामना” या वृत्तपत्रातून महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने अग्रलेख लिहिला आहे. “संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात पंडित नेहरू प्रतापगडावर आले तेव्हा त्यांच्या समोर निधडय़ा छातीने महाराष्ट्र उभा राहिला होता. महाराष्ट्राने दिल्लीची फालतू गुलामी कधीच पत्करली नाही. महाराष्ट्राला इतिहास आहे. बूड आहे म्हणून तो टिकला आहे. महाराष्ट्रनिर्मितीचा क्षण हा मंगलमयच असतो. तो दिवस महाराष्ट्राचे शौर्य व धैर्य दाखवणारा असतो. आज महाराष्ट्रावरचे संकट मोठे आहे. कोरोना विषाणूने मोठे आव्हान उभे केले आहे. शंभर वादळे, शंभर भूकंपांनी पडझड होणार नाही त्यापेक्षा जास्त पडझड एका विषाणूने केली. महाराष्ट्र लढत आहे, महाराष्ट्र लढत राहील व विजयी होईल”!

महाराष्ट्र राज्याला मुद्दामहून अडचणीत आणण्याचा प्रयत्न हा केला जातो. दिल्लीतील सरकारे जरीही बदलली असली तरीही महाराष्ट्राला अडचणीत आणण्याचा प्रयत्न हा आजही केला जातो आहे. महाराष्ट्र राज्याच्या हक्काच्या गोष्टी या महाराष्ट्राला मुद्दामहून मिळवून दिल्या जात नाहीत. महाराष्ट्रातील कित्येक प्रकल्प हे गुजरातला घेऊन जाण्यात आले आहे. मुंबईचे कसे महत्त्व कमी करता येईल त्याचा प्रयत्न केला जातो आहे. महाराष्ट्राची आर्थिक रसद तोडण्यामागील हेतू पण महाराष्ट्राचे, मुंबईचे महत्त्व कमी करणे हाच हेतू आहे. मात्र गुजरात जरी व्यापारी असला तरीही महाराष्ट्र हा लढवय्या आहे!

अशा प्रखड शब्दात आज सामना मधून महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या समोरील आव्हाने, महाराष्ट्राच्या पुढील करणारी पणा हा अग्रलेखातून मांडला आहे. तसेच महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा महाराष्ट्रातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या निमित्त दिल्या आहेत!

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.