कोथिंबीर उगवा घरच्या घरी तेही सॉईल फ्रि म्हणजेच मातीमुक्त सेंद्रिय पध्दतीने

0

प्रत्येक घरात छोटीशी बाग करण्याचा प्रयत्न केला जातो त्यात अनेक फुलांची तसेच फळांची झाडे लावली जातात. कढिपत्ता, कोथिंबुर लावली जाते. परंतत घर लहान असल्यास ही झाडे कुंडीत लावावी लागतात. बरेचदा अशावेळी शोची झाडे लावली जातात त्यात मनी प्लांटचा प्रामुख्यान समावेश असतो. बरेचजणांना घरातल्या घरात उपयुक्त झाड लावण्याची इच्छा असते. परंतु कमी जागेत ती कशी लावावी हा विचार मनात येत असतो. कोथिंबीर लावायला अनेक गृहीणींना आवडते परंतु बरेच जणींची तक्रार असते कोथिंबीर नीट वाढत नाही. आज आपण कोथिंबीर घरच्या घरी तेही वीना माती कशी उगवावी हे पाहणार आहोत.

कोथिंबीर उगवण्यासाठी आपल्याला धणे साधारण ३ चमचे व बारीक छीद्रांच प्लास्टीक कंटेनर लागणार आहे. हे कंटेनर धणे पडणार नाहीत एवढ सच्छीद्र घ्यायच आहे. तसेच कोकोपीट म्हणजेच नारळाच्या शेंडीचा चुरा जो बाजारात ५० रुपयाला एक वीट याप्रमाणे मिळतो तो एक वीट घ्यायचा आहे. ही वीट साधारण तुम्हाला १० ते १२ वेळा उपयोगी पडते. आणि नंतरही तुम्ही त्याचा वापर करत राहू शकता. बागेतील एक नवीन प्रयोग म्हणून तुम्ही ही कोथिंबीर उगवू शकता. सर्वप्रथम धणे हलक्या हाताने लाटण्यान दोन भागात चुरडून घ्या. आता हे धणे पाण्यात भिजत घाला. आता कोकोपीटचा चुरा करून तो भिजवून घ्या. मातीप्रमाणे चिखल तयार होईल, हे कोकोपीट प्लास्टीक कंटेनरमध्ये पसरा. यावर भिजलेले धणे उपसून पसरा त्यावर परत कोकोपिटचा पातळ थर पसरा. यावर पाणी शिंपडा. आता हे घरातच एका बाजूला ठेवा आणि यावर रोज एकदा पाणीशिंपडा. साधारण १० ते १२ दिवसात धणे अंकुरित होतात. आता या कंटेनर खाली पाऊण पाणी भरलेल पातेल ठेवा, या पातेलातील पाणी दर दोन दिवसानी बदला. २० दिवसात पूर्ण धणे अंकुरित होतात आता हे कंटेनर पाण्याच्या पातेल्यासह उन्हात ठेवा. पुढील पाच दिवसात कोथिंबीर उगवून येईल.

तुम्ही स्वता घरात उगवलेली कोणतही किटकनिशक, खत न वापरलेली कोथिंबीर वापरू शकता. तिची चव बघू शकता. कोथिंबीर उगवताना लक्षात घ्या धणे ताजे घ्या धणे जुने असल्यास किंवा भाजलेले असल्यास कोथिंबीर उगवून येत नाही.

 

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.