
परभणी जिल्ह्यात किराणा,भाजीपाला,बेकरी इ जीवनावश्यक सेवाही बंद
राज्यात सध्या कोरानाची साखळी खंडीत व्हावी यासाठी १५दिवसांची संचारबंदी लागू झाली आहे.अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व अस्थापना बंद ठेवण्याचे आदेश शासनाने जारी केले असून राज्यात कलम १४४लागू झाल आहे.अत्यावश्यक सेवा शासनाने जाहीर केलेल्या आहेत.यात भाजी, फळ,किराणा,दूध,बेकरी,खाद्यपदार्थ पार्सल इ सेवांचा समावेश आहे.मात्र काही ठिकाणी भाजी तसेच फळ घेण्यासाठी मोठ्याप्रमाणावर गर्दी होत असून संचार बंदी आणि सोशल डिस्टन्सींगचे नियम पायदळी तुडवले जात आहेत.प्रशासनाला ही गर्दी हटवताना नाकीनऊ येऊ लागलेत.
यासर्व घटनांनंतर वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता परभणीचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी स्थानिक पातळीवर निर्णय घेत भाजी,किराणा,बेकरीही बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.ही बंदी १७ एप्रिल ते ३०मेपर्यंत राहील.या निर्णयाला सर्वांनी सहकार्य कराव अस आवाहन त्यांनी केल आहे.गर्दी होऊन कोरोना साथ पसरून रुग्णसंख्या वाढू नये यासाठी हा निर्णय घेतल्याच त्यांनी स्पष्ट केल.
परभणी जिल्ह्यात रुग्णसंख्या झपाट्यान वाढत असून काल दिवसभरात नवीन ११७२रुग्ण वाढले,तसेच २०जणांच मृत्यू झाला.परिणामी आरोग्य यंत्रणा तसेच प्रशासन यात सयन्वय साधून रुग्णसंख्येला आळा बसावा यासाठी केलेली उपाययोजना यशस्वी ठरते का?हे बघाव लागेल.