
कोरोना बधितांच्या साठी, आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाची बातमी!
सध्याची परिस्थिती पाहता सगळेच कोरोनाने हैराण झाले आहेत. यावर लवकर काही औषधोपचार होऊन सगळी परिस्थिती नियंत्रणात आली पाहिजे असे सर्वांना वाटत असताना. कोरोना रुग्णांच्या साठी दिलासादायक बातमी आलेली आहे. कोरोना रुग्णांना झायडस कॅडीलच्या औषधाला केंद्र सरकार कडून परवानगी मिळाल्याने कोरोना रुग्णांच्या साठी मोठा दिलासा मिळाला आहे. ७ दिवसांत या औषधाने कोरोना बरा होत असल्याचे सांगितले जात आहे. विराफिन या औषधाला डीसीजीआय ने परवानगी दिली आहे. हे औषध ९१.१५% प्रभावी असल्याचा कंपनी ने दावा केला आहे. विराफिनचा एक डोस घ्यावा लागणार आहे म्हणजेच इंजेक्शन च्या एका डोस मध्ये सात दिवसांत कोरोना बरा होतो.
“झायडस कॅडलाचे विराफिन नावाचे औषध आहे याला केंद्र शासनाकडून परवानगी मिळाली आहे. याच्या ज्या चाचण्या आहेत त्या सर्व चाचण्या झालेल्या आहेत. या रुग्णांच्या पैकी १० रुग्णांच्या चाचणी आमच्याकडे झाल्या होत्या. हे औषध देत असताना इतर कोरोनाचे औषधे आहेत ते सुरूच ठेवावे लागतात; हे वेगळे औषध देता येत नाही. ज्या लोकांना औषध दिले तो पेशंट २-३ दिवस लवकर बरा होतो”. असे तात्याराव लहाने (सदस्य, टास्क फोर्स) यांनी सांगितले. मात्र उपचार हे डॉक्टर च्या सल्ल्याने घेतले पाहिजेत.