‘12 सदस्यांची रखडलेली नियुक्ती मार्गी लावून राज्यपालांनी महाराष्ट्राला वाढदिवसानिमित्त गोड भेट द्यावी’

0

आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा वाढदिवस, त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना नेते संजय राऊत यांनी शाल जोड्यातून शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर आणि माध्यमांच्या मध्ये चांगल्याच प्रकारे चर्चा सुरू आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर वाढदिवसाच्या निमित्ताने भेट घेतली. त्यांच्या सोबत शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर हे देखील उपस्थित होते. महाराष्ट्रात राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा दीड वर्ष संघर्ष सुरूच आहे. मात्र तरीही महाराष्ट्राची राजकीय संस्कृतीचा वारसा जपत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीवरून खोचक ट्विट करत राज्यपाल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा! विधानपरिषदेच्या 12 सदस्यांची रखडलेली नियुक्ती मार्गी लावून मा.राज्यपाल महोदयांनी महाराष्ट्राला वाढदिवसानिमित्त गोड भेट द्यावी. बाकी लोभ आहेच. तो तसाच राहील. जय महाराष्ट्र!’ अशा आशयाचे ट्विट त्यांनी केलं आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.