चंद्रपुरात गोपिचंद पडळकर यांच्या पुतळ्याला काळ फासून जोड्यान बडवल

0

चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या नेतृत्वात चंद्रपूर शहरातील कस्तुरबा चौकात काल दुपारी १२ वाजता आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात राज्याचे पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालक मंत्री विजय वडेट्टीवर यांच्यावर खोटेनाटे आरोप करणार्या भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे, चपलांनी चोप देण्यात आला.तसेच तोंडाला काळे फासून निषेध नोंदविण्यात आला.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्या रूपाने जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळाले आहे. त्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री म्हणून राज्यात उल्लेखनीय काम केले आहे. मात्र, मंत्री विजय वडेट्टीवार यांचे काम विरोधकांच्या डोळ्यात खुपत आहे. त्यामुळे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी कोणतेही पुरावे न सादर करता खोटे आरोप करून बदनामी करण्याचे षड्यंत्र रचले आहे. वडेट्टीवार यांच्यावर खोटे आरोप करणाऱ्या -या आमदार पडळकर यांच्याविरोधात राज्यातील बहुजन समाज आणि काँग्रेस प्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसेच गोपिचंद पडळकर यांनी विजय वडेट्टीवार यांची माफी मागावी अशीही मागणी करण्यात आली.

आमदार पडळकर यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी रितेश तिवारी यांनी यावेळी केली. यावेळी आमदार पडळकर यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे, चपलांनी चोपण्यात आले. तसेच तोंडाला काळे फासून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. आमदार पडळकर यांनी मंत्री विजय वडेट्टीवार यांची जाहीर माफी मागावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. त्यानंतर चंद्रपूर शहर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांच्याकडे आमदार पडळकर यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.